Rupee Vs Dollar : रुपया कमजोर नाही तर डॉलर मजबूत होतो आहे, अर्थमंत्र्यांचं हे विधान येत्या काळात आणखी खरं ठरु शकतं असा अंदाज आहे. कारण डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 च्या पातळीवर पोहोचू शकतो असं बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांनी सर्वेक्षणातून म्हटले आहे.


रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे सरकारपासून आरबीआयपर्यंत सगळेचजण त्रस्त असून ही समस्या लवकर संपेल अशी शक्यता आहे. रॉयटर्स एजन्सीने नुकतंच एत सर्वेक्षण केलं आणि यातूनच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशांतर्गत व्यापार संतुलन आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ यामुळे गेल्या नऊ वर्षांतील सर्वात मोठी घसरण रुपयात झाली आहे.
आज रुपया 83.2150 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला होता. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात 14 बँकर्स आणि विदेशी चलन तज्ञांनी सर्वेक्षणात अंदाज व्यक्त केला आहे की डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.


जागतिक वातावरणात सुधारणा न झाल्यामुळे ही घसरण कायम राहील - 
दक्षिण आशियाई चलन यावर्षी आतापर्यंत सुमारे 12% घसरले आहे, जे अंदाजे 2013 मध्ये झालेल्या घसरणीइतकेच आहे. त्याचवेळी या सर्वेक्षणात तज्ञांनी असा अंदाज वर्तवला की रुपया 83.25 ते 86 च्या दरम्यान राहील, ज्यावर व्यापक एकमत पाहायाला मिळालं आणि यावरुनच रुपयाची वाटचाल यंदा चांगली होणार नसल्याचे दिसते.


डिसेंबरपर्यंत रुपया 85 च्या पातळीवर घसरू शकतो, कारण आम्हाला बाह्य वातावरणात कोणताही मोठा बदल दिसत नाही. त्याचवेळी डॉलर सतत वाढतो आहे आणि आमच्या स्थानिक मूलभूत गोष्टी कमकुवत होत जात आहेत. आम्ही भारताची चालू खात्यातील तूट (CAD) 3% -3.50% असण्याची अपेक्षा करत आहोत असं  बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.


रुपयाच्या कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारांवर - 
चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आक्रमक वाढ केल्याने भांडवली आवक प्रभावित झाली आहे. फेडच्या वाढीमुळे या वर्षी डॉलर निर्देशांक जवळजवळ 18% वर ढकलला गेला आहे आणि गुंतवणूकदारांना उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतून पैसे काढण्यास भाग पाडले आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉजीटरीच्या (NSDL) आकडेवारी विदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून $23.4 अब्ज आणि कर्जातून $1.4 अब्ज काढले आहेत.


रुपया कमकुवत झाल्याने परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. जेव्हा जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेला असे वाटते की रुपया खूप कमी होत आहे, तेव्हा ती डॉलरची विक्री करण्यास सुरवात करते, ज्यामुळे परकीय चलन राखीव कमी होते. त्याचवेळी रुपयाच्या कमजोरीमुळे आयात महाग झाली आहे. त्याचा थेट परिणाम येथील सर्वसामान्यांवर होत आहे. 


NSDL म्हणजे काय - 
सेन्ट्रल डिपॉजीटरी सर्व्हिस इंडिया (CDSL) आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉजीटरी (NSDL) ह्या दोन्ही सरकारमान्य शेअर डिपॉजीटरी आहेत.शेअर डिपॉजीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये शेअर होल्ड करतात.मागच्या काही वर्षांमध्ये शेअर ट्रेडिंग फक्त ऑफलाईन पद्धतीने होते,आणि शेअर पेपर सर्टिफिकेट द्वारे घेतले जायचे.पण आता डिजिटल युगामध्ये शेअर होल्ड करणे देखील डिजिटल झाले आहे.जसे बँक आपली डिपॉजीट डिजिटल ठेवायला मदत करते.तसेच शेअर डिपॉजीटरी शेअर डिजिटल ठेवायला मदत करतात.