Mini Electric Car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक उत्पादन बाजारात उतरवत आहेत. मात्र यातच प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंदा अँड महिंद्रा एक वेगळी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार आहे. महिंद्रा भारतात लवकरच 2-डोअर क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार (Mahindra Electric Car) लॉन्च करणार आहे. या कारचे नाव महिंद्रा अॅटम असून ही एक मिनी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ही कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. लॉन्च होण्यापूर्वीच याची बरीच माहिती मीडियामध्ये लीक झाली आहे. ही देशातील पहिली क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार असणार आहे.
महिंद्र अॅटममध्ये (Mahindra Electric Car) दोन विंडोसह सिंगल वायपर, लोखंडी ग्रिल, ब्लॅक-आउट पिलर, एलईडी हेडलॅम्प, फ्लॅट विंडस्क्रीन देण्यात आले आहे. ही कार दिसायला खूपच बॉक्सी आहे. कार मोनोकोक चेसिसवर आधारित आहे.
चार प्रकारात होणार लॉन्च
इंटरनेटवर लीक झालेल्या माहितीनुसार, महिंद्रा अॅटम K1, K2, K3 आणि K4 अशा एकूण चार प्रकारांमध्ये बाजारात उतरणार आहे. ज्यामध्ये K1 मध्ये 7.4 kWh, K2 मध्ये 144 Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. तर K3 ला 11.1 kWh आणि K4 ला 216 Ah बॅटरी पॅक मिळेल. याच्या लहान आणि मोठ्या बॅटरीचे वजन अनुक्रमे 98 किलो आणि 145 किलो असेल.
किंमत किती?
महिंद्र आपल्या अॅटम इलेक्ट्रिक कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 3 लाख रुपये ठेवू शकते, ज्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सध्या भारतीय बाजारपेठेत या कारला टक्कर देण्यासाठी कोणतेही मॉडेल उपलब्ध नाही.
इतर महत्वाची बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI