मुंबई : खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्याने किरकोळ महागाई 6.07 टक्क्यांवर पोहोचली. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी 2022 मध्ये 6.07 टक्के होता. एक वर्षापूर्वी याच महिन्यात 5.03 टक्क होता, तर जानेवारी 2022 मध्ये हा दर 6.01 टक्के होता. भारतीय रिझर्व्ह बँक दर दोन महिन्यांनी पतधोरण पुनरावलोकनाच्या वेळी ग्राहक किंमतीवर आधारित महागाईचा विचार करते. भारत सरकारने आरबीआयला महागाई दर 2 टक्क्यांनी वाढण्याची किंवा घसरण्याची शक्यता असलेल्या 4 टक्क्यांवर कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


घाऊक महागाई


घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्के होता. सलग 11व्या महिन्यात घाऊक महागाई दर दुहेरी अंकात गेला आहे. कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हे त्यामागचे महत्त्वाचे कारण होते. आरबीआयला सरकारने दोन्ही बाजूंनी 2 टक्क्यांच्या फरकाने किरकोळ महागाई 4 टक्क्यांवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तेल आणि स्निग्धांच्या किमतीत 16 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई 8 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली, त्यानंतर फुटवेअर मध्ये 10.10 टक्क्यांनी आणि इंधन आणि प्रकाशाच्या किमतीत 8.73 टक्क्यांनी वाढ झाल्याचं तक्त्यामध्ये दर्शविण्यात आले आहे.


सरकारने दिलेल्या माहितीनुसार खाद्यपदार्थांच्या किमतीत अधिक वाढ झाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये WPI महागाई 13.11 टक्क्यांनी वाढली. तर एप्रिल 2021 पासून सलग अकराव्या महिन्यात WPI महागाई दुहेरी अंकात राहिली आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई 12.96 टक्के होती तर डिसेंबर 2021 मध्ये ती 13.56 टक्के होती. दरम्यान, भारताचे वार्षिक औद्योगिक उत्पादन जानेवारीमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढले आहे, जे एका वर्षापूर्वी याच महिन्यात 0.6 टक्क्यांनी घसरले होते.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha