Himalaya : सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटमुळे ट्विटरवर बायकॉट हिमालया (Boycott Himalaya) ट्रेंड होत आहे. फोटोमध्ये फार्मास्युटिकल कंपनी हिमालया ही  हलालचा वापर करून  प्रोडक्ट तयार करते असं लिहिण्यात आलं आहे. फोटोमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हिमालया कंपनी हर्बल, केमिकल, फूड कलर उत्पादनांमध्ये हलालचा वापर करते. ज्यांमुळे मुस्लिम ग्राहक हे या प्रोडक्टकडे आकर्षित होतील. तसेच कंपनी इस्लामिक कायद्यांचे पालन करते, असे देखील या फोटोमध्ये म्हटलं आहे. 


हिमालया कंपनीबाबतचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी  ट्विटरवर या कंपनीचा निषेध करत ट्वीट शेअर करण्यास सुरूवात केली. काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करून म्हटलं की, जो पर्यंत या व्हायरल फोटोवर कंपनी स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत आम्ही बायकॉट हिमालया ही मोहीम ट्विटरवर सुरू ठेवू. 
 
जून 2021 रोजी देखील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये हिमालया कंपनी ही त्यांच्या  निम, तुळसी आणि लसुना या सप्लिमेंट्समध्ये हलाल मांसचा वापर करते, असा दावा करण्यात आला होता. 






हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय?
अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये सरकारद्वारे हलाल प्रमाणपत्र जारी केले जाते. भारतातील अनेक खाजगी कंपन्या हलाल प्रमाणपत्र देतात, जे अन्न किंवा वस्तू मुस्लिमांसाठी योग्य असल्याचे प्रमाणित करते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha