Credit/Debit Card Rules : केंद्रीय बँक म्हणजेच, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक आणि कंपन्यांसाठी क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि डेबिट कार्ड (Debit Card) संदर्भात नवीन नियमावली जारी करण्यात आली आहेत. हे नवे नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान, RBI जारी केलेले हे सर्व नियम सार्वजनिक क्षेत्रातील Nationalised बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना (NBFCs) पाळावे लागतील. त्याचबरोबर राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पेमेंट बँकांना ही नवीन मार्गदर्शक तत्त्व लागू होणार नाहीत. 


ग्राहकांना दिलासा 


केंद्रीय बँकेनं नव्या गाईडलाइन्स (RBI New Guidelines) जारी करुन ग्राहकांना दिलासा दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी केल्यानंतर कंपन्यांनी मनमानी केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी आरबीआयनं पाऊल उचलत या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड बंद करताना कंपनी अनेकदा मनमानी करत असल्याच्या तक्रारी अनेकदा ग्राहकांकडून केल्या जात असल्याचं निदर्शनास आलं होतं. कार्ड बंद होण्यास अनेकदा विलंब होतो, त्यामुळे ग्राहकांना काही वेळा मोठा दंड भरावाही लागतो. अशातच, आता आरबीआय ग्राहकांच्या विनंतीवरून RBI ने क्रेडिट आणि डेबिट कार्ड 7 दिवसांच्या आत बंद करणं बंधनकारक केलं आहे. तसं न केल्यास प्रतिदिन 500 रुपयांचा दंड बँकांना ग्राहकांना द्यावा लागणार आहे.  


कार्ड बंद झाल्याच्या सूचना ग्राहकांना द्यावा लागणार 


आरबीआय (RBI) च्या नव्या गाईडलाईन्सनुसार, जर एखाद्या कार्डधारकानं सर्व बिलं भरली, तर ग्राहकांच्या विनंतीनुसार, कंपनी किंवा बँकेला 7 दिवसांच्या आत कार्ड बंद करावं लागेल. असं न केल्यास, 7 दिवसांनंतर, बँकेला ग्राहकांना दररोज 500 रुपये दंड द्यावा लागेल. यासोबतच बँकेला क्रेडिट आणि डेबिट कार्ड बंद झाल्याची माहिती ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर लवकरात लवकर पाठवावी लागेल.


या कारणामुळे ग्राहकांचं क्रेडिट कार्ड बंद होऊ शकतं


आरबीआयनं असंही निर्देश दिले आहेत की, जर एखाद्या व्यक्तीनं एक वर्ष क्रेडिट कार्डचा सतत वापर केला नाही तर अशा परिस्थितीत बँक त्यांचे कार्ड बंद करू शकते. परंतु, असं करण्यापूर्वी बँक ग्राहकाला माहिती देईल. मेसेज पाठवल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहक प्रतिसाद देत नसेल किंवा कार्ड वापरत नसेल, तर अशा स्थितीत बँक ग्राहकांचं क्रेडिट कार्ड बंद करू शकते.