MHT CET 2022 Last Date To Apply Today With Late Fees : स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट, महाराष्ट्र (Maharashtra CET)  द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सीईटी परीक्षेसाठी 2022 (MHT CET 2022) अर्ज करण्याची शेवटची तारीख आज, म्हणजेच 23 एप्रिल आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विलंब शुल्काशिवाय अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल देण्यात आली होती. ज्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा आहे, ते या प्रवेश परीक्षेसाठी (Maharashtra Common Entrance Test 2022) आज 500 रुपये विलंब शुल्क भरून अर्ज करू शकतात. या सर्व उमेदवारांना नोंदणी शुल्काव्यतिरिक्त ही फी भरावी लागेल. 


या वेबसाइटवरून अर्ज करा


महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट (MHT CET 2022) अर्ज करण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल – cetcell.mahacet.org आणि mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला. कृपया लक्षात घ्या की, अर्जाची अंतिम तारीख आधीच 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. 


MHT CET या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक 


महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MHT CET ही परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो.


विलंब शुल्कासह अर्ज 16 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान करायचे होते आणि आज शेवटचा दिवस आहे.


प्रवेश परीक्षा पुढे ढकलली


यापूर्वी महाराष्ट्र CET परीक्षा जूनमध्ये होणार होती. परंतु ती आता NEET आणि JEE सारख्या प्रमुख परीक्षांच्या तारखा आणि CET परीक्षेची तारीखा एकत्र येत असल्यानं ऑगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. 


शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी  परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र  JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच तारखा जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. अद्याप नव्या तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI