Samantha Ruth Prabhu : साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे. पती-अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथा प्रसिद्धी झोतात आली होती. यानंतर समंथानी केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आताही समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशी एक पोस्ट केली आहे, जी तिच्या चाहत्यांना आवडली आहे.


समंथा प्रभूने तिच्या ट्विटर अकाउंटवरून नुकताच एक कोट ट्विट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने म्हटलेय की, 'माझ्या मौनाला माझे अज्ञान समजण्याची चूक कधीही करू नका. माझ्या शांत स्वभावाला माझी मान्यता मानू नका. माझी नम्रता माझी कमजोरी मानू नका.’ इतकेच नाही, तर हा कोट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, 'नम्रतेचीही एक्सपायरी डेट असू शकते'. अभिनेत्रीचे हे ट्विट तिच्या चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे.


पाहा पोस्ट :



कोणाला होता इशारा?


समंथाचा हा कोट पाहिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. घटस्फोटानंतर समंथाला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र, तिने नेहमीच शांत राहणे पसंत केले. मात्र, आता तिचा हा इशारा असंच ट्रोल करणाऱ्या लोकांसाठी आहे, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे, तिचा माजी पती नागा चैतन्य याच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच समंथाचा हा इशारा चर्चेचा विषय बनला आहे.   


समंथाला होतोय टॅटूचा पश्चात्ताप


समंथाच्या शरीरावर तीन टॅटू आहेत. यातील एक टॅटू तिच्या पाठीवर आहे, ज्यामध्ये YMC म्हणजेच ‘ये माया चेसावे’ असे लिहिले आहे. हे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये तिचा माजी पती नागा चैतन्यने देखील मुख्य भूमिका साकारली होती. समंथाचा आणखी एक टॅटू तिच्या बरगडीवर आहे, ज्यामध्ये Chay लिहिले आहे. ‘चाय’ हे नागा चैतन्यचे टोपणनाव आहे. तिसरा टॅटू सरळ मनगटावर कोरलेला आहे, ज्यामध्ये बाणाचे चिन्ह बनवले आहे. नागा चैतन्यनेही उजव्या हाताच्या मनगटावर असाच टॅटू काढला आहे. नागासोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथाला हे टॅटू काढल्याचे पश्चाताप होत आहे.


हेही वाचा :