मुंबई : मोबाईल आणि इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. इंटरनेटच्या (Internet) युगात जग जवळं आलं एका क्लिकवर जगभरातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सरकारच्या डिजिटल इंडिया धोरणामुळे आर्थिक व्यवहार आणि अनेक उद्योगही ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे, देशातील मोबाईलधारकांची आणि इंटरनेट युजर्संची गेल्या 2 वर्षात झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मोबाईल व इंटरनेट युजर्संची संख्या वाढत असताना, दुसरीकडे टेलिकॉम (Telicom) कंपन्यांकडून इंटरनेट डेटा आणि रिचार्जची सातत्याने दरवाढ होत आहे. मोबाईल धारकांसाठी सुरुवातील मोफत सीमकार्ड वाटणाऱ्या जिओ (Jio) कंपनीने आता आपल्या 5जी इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात 20 ते 25 टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे, जिओ ग्राहकांच्या खिशावर त्याचा चांगलाच भार पडणार आहे.


जिओकडून नव्या अनलिमिटेड वैधता प्लॅनची घोषणा करण्यात आली असून जिओच्या 5जी सेवेसह हे प्लॅन ग्राहकांना पुरवले जात आहेत. नव्या प्लॅननुसार 28 दिवसांसाठी 5जी अनलिमिटेड डेली 2 जीबी प्लॅन घ्यायचा असल्यास ग्राहकांना आता 189 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी ग्राहकांकडून 155 रुपये आकारण्यात येत होते. तर, 56 दिवसांच्या 5जी अनिलिमिटेड डेली 2जीबी प्लॅनसाठी आता 629 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी 533 रुपये आकारण्यात येत होते. तर, 3 महिन्यांच्या म्हणजेच 84 दिवसांचा डेली 2 जीबी डेटासाठी आता 859 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी 719 रुपये आकारले जात होते. 


दरपत्रकानुसार नवीन दर


1. नव्या प्लॅननुसार 28 दिवसांसाठी 5जी अनलिमिटेड डेली 2 जीबी प्लॅन घ्यायचा असल्यास ग्राहकांना आता 189 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी ग्राहकांकडून 155 रुपये आकारण्यात येत होते.


2. 56 दिवसांच्या 5जी अनिलिमिटेड डेली 2जीबी प्लॅनसाठी आता 629 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी 533 रुपये आकारण्यात येत होते.


3. 3 महिन्यांच्या म्हणजेच 84 दिवसांचा डेली 2 जीबी डेटासाठी आता 859 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी 719 रुपये आकारले जात होते. 


4. वार्षिक डेली 2.5 जीबीच्या प्लॅनसाठी यापूर्वी 2999 रुपये आकारले जात होते. आता, नवीन दरपत्रकानुसार वार्षिक डेली 2.5 जीबीच्या प्लॅनसाठी 3599 रुपये आकारले जाणार आहेत. 






नवे दरपत्रक




दरम्यान, डिजिटल इंडियात नेटीझन्स स्मार्ट बनले असून स्मार्टफोन हा प्रत्येकासाठी जवळपास अनिवार्य बनला आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा वापरही अत्यावश्यक बनला आहे. त्यामुळे, आजकाल मोबाईल हे केवळ बोलण्याचे किंवा चॅटींगचे माध्यम राहिले नसून करलो दुनिया मुठ्ठी मे.. या टॅगलाईनप्रमाणे जगाशी जोडले गेले आहे. मात्र, तुम्हाला जगाशी जोडलं जाण्यासाठी आता रिचार्जच्या माध्यमातून दरमहा मोठी रक्कम द्यावी लागते. आता, जिओने आपल्या 5 जी सेवेतील दरपत्रकात वाढ केली आहे. त्यानुसार, जिओ ग्राहकांना 3 जुलै 2024 पासून नवीन दरपत्रकानुसार जिओचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. 


हेही वाचा


अनंत अंबानीकडं कोणत्या गाड्या? किंमत एकूण बसेल धक्का, जाणून घ्या सविस्तर माहिती