Aurangabad News : लग्नकार्य म्हटलं की मित्र परिवाराच्या जल्लोष हा टिपेला पोहचलेला असतो. अशातच औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात मित्राच्या लग्नात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मित्राच्या लग्नात हातात तलवार घेऊन बेधुंद होऊन नाचणाऱ्याला मात्र आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात अशाप्रकारच्या घटना सर्रासपणे घडत असून गुंड प्रवृत्ती फोफावत असल्याचे दिसत आहे. 


मित्राच्या खांद्यावर बसून ताल धरला.. अन् थेट तलवार बाहेर काढून नाचू लागला.


लग्नकार्य म्हटलं की मित्र परिवाराच्या जल्लोष हा टिपेला पोहचलेला असतो. अशातच हळदीवेळी नुसता कल्ला असतो. यातच नाच गाणं आलंच, मात्र हेही एका सीमेपर्यंत ठीक आहे. एका हळदीच्या कार्यक्रमात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण हातात कोयते आणि तलवारी घेऊन नाचत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवरदेवासह त्याचे मित्र फरार झाले असल्याची माहिती समोर आली होती.


उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


सूर्यकांत गीताराम शिंगाडे असे या तरुणाचं नाव आहे, शहरातील प्रतापनगरच्या मैदानात सूर्यकांतच्या मित्राचे लग्न होते. यावेळी सूर्यकांतने मित्राच्या खांद्यावर बसून ताल धरला   आणि थेट तलवार बाहेर काढून नाचू लागला. तसेच या सर्व घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला,त्यानंतर व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहचताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे, तर याप्रकरणी शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हातात कोयता आणि तलवारी घेत 'मै हु डॉन' गाण्यावर ठेका


याआधी देखील लातूर शहरात अशीच घटना समोर आली होती. एलआयसी कॉलनी भागात शुभम तुमकुटे यांचे लग्न असल्यामुळे हळदीच्या कायर्कम ठेवण्यात आला होता. याच कार्यक्रमाला त्याचे सात ते आठ मित्र आले होते. हळदीचा कार्यक्रम असल्याने ही सर्वच मंडळी रंगात असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे या सर्व तरुणांनी हातात कोयता आणि तलवारी घेत 'मै हु डॉन' या गाण्यावर ठेका धरला होता. हा सर्व गोंधळ सार्वजनिक ठिकाणी दीड तास सुरू होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Latur : हळदीच्या कार्यक्रमात तलवार अन् कोयते! व्हिडीओ व्हायरल होताच नवरदेवासह मित्र फरार


Raj Thackeray Aurangabad Rally Teaser : औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित


MNS : औरंगाबादमध्ये जमावबंदी, शरद पवारांची सभा होणार का? 1 मेच्या सभेसाठी प्रतीक्षेत असलेल्या मनसेचा सवाल


औरंगाबादेत 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार?