Reliance Industries Net Profit : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील फायदा हा त्या आधीच्या तिमाहीच्या तुलनेत 43 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत एकूण फायदा हा 13,680 कोटी रुपये इतका झाला आहे. त्या आधीच्या तिमाहीत निव्वळ फायदा हा 9,567 कोटी रुपये इतका होता.
रिलायन्सच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील उत्पन्न हे 1,78,328 कोटी रुपये इतकं झालं आहे. एक वर्षाआधी हे उत्पन्न 1,20,444 कोटी रुपये इतकं होतं. रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ फायदा हा 23.5 टक्क्यांनी वाढून तो 3,728 कोटी रुपये इतका झाला आहे. तसेच जिओच्या उत्पन्नात 15.2 टक्क्यांची वाढ होऊन ते 23,222 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
या वर्षीच्या भारतातील 100 सर्वाधिक श्रीमंत लोकांची फोर्ब्ज लिस्ट जाहीर झाली असून या यादीत रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सलग 14 व्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे आहेत.
Hurun India ने नुकतेच जाहीर केलेल्या आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे टॉपवर आहेत. गेल्या वर्षीच्या काळात रिलायन्सच्या मुकेश अंबानींची संपत्ती रोज 163 कोटी रुपयांनी वाढली मुकेश अंबानी कुटुंब भारतातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब आहे. रिपोर्टच्या मते, मुकेश अंबानींची संपत्ती ही 7,18,000 कोटी इतकी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 9 टक्क्यांची वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या :
- Mukesh Ambani : मुकेश अंबानी जगातील 11 वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्क, जेफ बेजोस यांच्या क्लबमध्ये सामील
- Hurun India : सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, अदानींच्या संपत्तीत रोज 1002 कोटींची भर
- Forbes List : कोरोना काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ, मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत