Reliance Disney Joint Venture : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Viacom18) आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यात एक करार झाला असून या दोन्ही कंपन्यांनी मनोरंजन क्षेत्रात एक जॉईंट व्हेंचर (Joint Venture) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.  या भागीदारीअंतर्गत रिलायन्सकडून 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. नीता अंबानी (Nita Ambani) या संयुक्त उपक्रमाच्या अध्यक्ष असतील तर उदय शंकर उपाध्यक्ष असतील. उदय शंकर हे या संयुक्त उपक्रमासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहेत.


रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला या कराराची माहिती दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यात एक संयुक्त उपक्रम तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. त्यामुळे वायकॉम 18 आणि स्टार इंडियाचा व्यवसाय एकत्र होईल. या करारांतर्गत, Viacom18 चा मीडिया व्यवसाय स्टॉक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलीन केला जाईल. यासाठी न्यायालयाकडून मंजुरी घेतली जाईल. 


ट्रांजेक्सन व्हॅल्यू 70 हजार कोटींची (Reliance - Disney Joint Venture)


रिलायन्स या संयुक्त उपक्रमात 11,500 कोटी रुपये म्हणजेच 1.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पोस्ट-मनी बेसिसवर या संयुक्त उपक्रमाची ट्रांजेक्शन व्हॅल्यू अंदाजे 70,352 कोटी रुपये आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजचा संयुक्त उपक्रमात 16.34 टक्के हिस्सा असेल, तर Viacom18 कडे 46.82 टक्के आणि डिस्ने 36.84 टक्के हिस्सा असेल.


हा संयुक्त उपक्रम मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील देशातील आघाडीच्या प्लॅटफॉर्ममध्ये सामील होणार आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत, कलर्स, स्टारप्लस आणि स्टारगोल्ड यांसारख्या मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या मीडिया मालमत्ता एकत्र येतील. त्यामुळे स्पोर्ट्स स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 एकत्रीकरण होईल. यात JioCinema आणि Hotstar या डिजिटल प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. या संयुक्त उपक्रमाचे भारतात 75 कोटी प्रेक्षक असतील आणि जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचतील.


या करारावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, हा एक ऐतिहासिक करार आहे जो भारतीय मनोरंजन उद्योगात नवीन पर्व सुरू करतो. जागतिक स्तरावर सर्वोत्तम माध्यम समूह म्हणून डिस्नेचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. आम्ही देशभरातील प्रेक्षकांना परवडणाऱ्या किमतीत उत्तम कंटेंट देऊ.


मुकेश अंबानींनी आयपीएलचे डिजिटल अधिकार स्वतःकडे ठेवून ते लोकांसाठी मोफत ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे. अशाप्रकारे डिस्नेसोबतच्या डीलमध्ये त्यांना ईएसपीएनचे मालकी हक्क मिळतील. त्यासोबतच स्टार स्पोर्ट्सच्या एकापेक्षा जास्त चॅनलही त्याच्या खात्यात नोंदणीकृत होतील.


ही बातमी वाचा: