मुंबई: आजपासून पुढील तीन दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पाडणार आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्ष यांची निवड होणार आहे. आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे, याची क्रमवारी आता समोर आली आहे. यामध्ये कोणत्या आमदाराला पहिल्यांदा शपथ दिली जाणार त्याबाबतची माहिती समोर आली आहे. (Special Session In Maharashtra Legislative Assembly)
विधिमंडळ सचिवालयाकडून शपथविधीचा क्रम आता जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या चैनसुख संचेतींना पहिल्या क्रमांकावर शपथ देण्यात येणार आहे. त्यानंतर जयकुमार रावळ यांना तर माणिकराव कोकाटे हे तिसऱ्या नंबर वरती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाचव्या क्रमांकावर असतील, एकनाथ शिंदे सहाव्या तर अजित पवार शपथ घेणाऱ्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर असणार आहेत.
पंधराव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनास आज(शनिवार)पासून सुरुवात होत आहे. शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत सर्व 288 सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर राज्यपालांचे नवीन विधानसभेपुढे अभिभाषण होईल. अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या, विधेयके सादर केली जातील.(Special Session In Maharashtra Legislative Assembly)
78 नव्या आमदारांचा पहिल्यांदा होणार शपथविधी
विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या 78 नव्य आमदारांचा आज पहिल्यांदा शपथविधी होणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे 33, शिवसेना (एकनाथ शिंदे) 14, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 8, शिवसेना (उद्धव ठाकरे) 10, काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार) 4 सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष व किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे.
कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष
विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी काल (शुक्रवारी) निवड करण्यात आली आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात काल शपथ देण्यात आली आहे.
भाजपचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार
शंकर जगताप - चिंचवड
राजन नाईक - नालासोपारा
राघवेंद्र पाटील - धुळे ग्रामीण
संजय उपाध्याय - बोरिवली
अतुल बाबा भोसले - कराड दक्षिण
अनुराधा चव्हाण - फुलंब्री
मनोज घोरपडे - कराड उत्तर
श्रीजया चव्हाण - भोकर
राहुल अवाडे - इचलकरंजी
श्याम खोडे - वाशिम
मिलिंद नरोटे - गडचिरोली
अनुप अग्रवाल - धुळे शहर
हरीशचंद्र भोये - विक्रमगड
अमोल जावळे - रावेर
देवेंद्र कोथे- सोलापूर शहर मध्य
किसन वानखडे - उमरखेड
चरणसिंह बाबुलालजी ठाकूर - काटोल
सुमित वानखेडे - आर्वी
विक्रम पाचपुते - श्रीगोंदा
उमेश यावलकर - मोर्शी
राजेश वानखेडे - तिवसा
राजेश बकाने - देवळी
हेमंत रासने - कसबा पेठ
सई डहाके - कारंजा
सुलभा गायकवाड- कल्याण पूर्व
प्रवीण तायडे - अचलपूर
स्नेहा दुबे पंडीत - वसई
देवराव विठोबा भोंगळे - राजुरा
करण देवतळे - वरोरा
शिवसेना ठाकरे गटाचे पहिल्यांदा निवडून आलेले 10 आमदार
वरुण सरदेसाई - वांद्रे पूर्व
महेश सावंत -माहीम
मनोज जामसूतकर -भायखळा
हारून खान - वर्सोवा
अनंत बाळा नर - जोगेश्वरी
सिद्धार्थ खरात -मेहेकर
गजानन लवटे -दर्यापूर
संजय देरकर -वणी
प्रवीण स्वामी -उमरगा
बालाजी काळे -खेड
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार
उत्तमराव जानकर- माळशिरस
रोहित पाटील- तासगाव कवटे महाकाळ
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
अभिजित पाटील- माढा
नारायण पाटील- करमाळा
राजू खरे- मोहोळ
राष्ट्रवादीचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार
सिंदखेडराजा- मनोज कायंदे
अनुशक्तिनगर - सना मलिक
शिरूर - माउली कटके
भोर - शंकर मांडेकर
पारनेर - काशिनाथ दाते
गेवराई - विजयसिंह पंडित
फलटण - सचिन पाटिल
पाथरी- राजेश विटेकर (विधानसभा पहिल्यांदा)