मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. या बँकेवर आरबीआयने (RBI Bank) अनेक निर्बंध लागू केले आहेत. याच कारणामुळे ककोटक महिंद्र बँकेचे शेअर (Kotak Mahindra Bank Share) गडगडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) 10 टक्क्यांनी घसरण झाली असून सध्या या बँकेच्या शेअरचे  मूल्य चांगलेच खाली आले आहे. गेल्या दोन दिवसांत कोटक महिंद्रा बँकेचे शेअर साधारण 12 टक्क्यांनी खाली आले आहेत. आजदेखील (26 एप्रिल) या बँकेचा शेअर चांगलाच घसरला असून सध्या त्याचे मूल्य 1608.50 रुपये झाले आहे. दरम्यान, महिंद्र बँकेच्या या स्थितीमुळे या बँकेचे संस्थापक आणि नॉन एक्झीकेटिव्ह डायरेक्टर उदय कोटक यांचादेखील कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीत तब्बल 10328 कोटी रुपयांची घट झाली आहे. 


उदय कोटक यांच्या संपत्तीत तब्बल 10328 कोटींची घट 


उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेची स्थापना केलेली आहे. ते या बँकेचे सध्या नॉन एक्झीकेटिव्ह डायरेक्टर आहेत. ब्‍लूमबर्ग बिलेनियर इंन्डेक्सनुसार गुरुवार त्यांच्या संपत्तीत 1.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10328 कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 13.1 अब्ज डॉलरपर्यंत खाली आहे. या फटक्यामुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत थेट 155 व्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहेत.  


कोटक महिंद्रा बँकेला काय फटका बसला 


कोटक महिंद्रा बँकेत उदयक कोटक यांची एकूण 26 टक्के हिस्सेदारी आहे. ब्लूमबर्क बिलेनियर इंन्डेक्सवर 24 एप्रिलपर्यंत त्यांची एकूण संपत्ती ही 14.4 अब्ज डॉलर्स होती.  मात्र आरबीआयच्या निर्णयामुळे कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स पडले. त्यामुळे या बँकेचे बाजार भांडवल 39 हजार 768.36 रुपयांनी घटून 3 लाख 26 हजार 615.40 कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे. याच कारणामुळे ही बँक आता बाजार भांडवल बाजराच्या तुलनेत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. या बँकेच्या पुढे अॅक्सिस बँक आहे.  


1985 साली बँकेची स्थापना 


कोटक महिंद्र कंपनीची 1985 साली स्थापना करण्यात आली होती. या कंपनीची सुरुवात उदय कोटक यांनीच केली होती.  गेल्या वर्षी एक सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. 


हेही वाचा :


आधी गृहिणी आता चालवते तब्बल 800 कोटींची कंपनी, धोनीची सासू शीला सिंह करते तरी काय?


ICICI बँकेच्या ग्राहकांचा डेटा लीक? तब्बल 17 हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय; सामान्यांवर काय परिणाम?


SBI चा शेअर भलताच खातोय भाव, तुम्हीही होऊ शकता मालामाल! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?