मुंबई : दिग्गज क्रिकेटपटून महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. क्रिकेट खेळताना त्याची चपळाई आणि चतुरता तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्याने वेगवेगळ्या चांगल्या कंपनीतही गुंतवणूक करून आर्थिक सजगतेचीही चुणूक दाखवलेली आहे. त्याने वेगवेगळ्या कंपन्यांत गुंतवणूक केलेली आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनी हा कोट्यधीश आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण महेंद्रसिंह धोनीची सासू म्हणजेच साक्षी धोनीची (Sakshi Dhoni) आई शीला सिंह (Who is Sheila Singh) यादेखील कोट्यधीश आहेत, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. त्या तब्बल 800 कोटी रुपयांची एक कंपनी सांभाळतात.
धोनीची सासू आहे सीईओ
महेंद्रसिंह धोनीची 'धोनी इंटरटेन्मेंट लिमिटेड' (Dhoni Entertainment Limited) नावाची एक कंपनी आहे. या कंपनीची जबाबदारी शीला सिंह यांच्यावर आहे. शीला सिंह धोनी इंटरटेन्मेंट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या या कंपनीची धुरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्त्वात धोनीच्या या कंपनीने मोठी प्रगती केली आहे.
2020 साली सीईओ पदाची जबाबदारी
महेंद्रसिंह धोनीने 2020 साली शीला सिंह यांच्याकडे धोनी इंटरटेन्मेंट लिमिटेड या कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवली होती. धोनीच्या या निर्णयानंतर या कंपनीने चांगली प्रगती केलेली आहे. साक्षी धोनी आणि शीला सिंह या प्रामुख्याने या कंपनीवर लक्ष देतात. या कंपनीने आतापर्यंत अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत. याआधी शीला सिंह या गृहिणी होत्या. त्यांचे पत्नी आर के सिंह कनोई ग्रुपच्या बिनागुरी टी कंपनीत कामाला धोनीच्या वडिलांसोबत कामाला होते.
चार वर्षांत कंपनीचे बाजार भांडवल 800 कोटी
शीला सिंह आणि साक्षी धोनी या दोघींनी धोनीच्या या कंपनीला यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. या कंपनीची संपत्ती चार वर्षांत 800 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. धोनीच्या या प्रोडक्शन हाऊसचे सर्वाधिक शेअर्स साक्षी धोनी यांच्याकडे आहेत. दरम्यान, साक्षी आणि महेंद्रसिंह धोनी हे 2007 साली पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्यावेळी धोनी कोलकात्यात गेलेले असताना ताज बंगाल नावाच्या हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमध्ये साक्षी इंटर्न म्हणून काम करत होत्या. साक्षी धोनी या महेंद्रसिंह धोनी यांच्यासोबत चेन्नईतील रांजी रेज हॉकी क्लबच्या सहमालक आहेत.
हेही वाचा :
व्हॉट्सॲपवर आलेलं 'Meta AI' फीचर आहे तरी काय? जगातली सगळी माहिती एका क्लीकवर?
30 हजार रुपये गुंतवा अन् व्हा 5 कोटींचे मालक, जाणून घ्या करोडपती बनवणारा SIP चा 'हा' फॉर्म्यूला!