मुंबई : तुम्ही क्रेडिट कार्ड (Credi Card) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. कारण आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) तब्बल 17 हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहेत. नव्या ग्राहकांना जारी केलेल्या क्रेडिट कार्डची माहिती जुन्या ग्राहकांशी जोडली गेली. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. या चुकीमुळे बँकेच्या ग्राहकांना आर्थिक नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देऊ, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार तांत्रिक चूक झाली असली तरी यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बँकेच्या नव्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा नंबर जुन्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डशी जोडला गेला होता.  ज्यामुळे बँकेच्या अॅपवर जुन्या ग्राहकांना नव्या ग्राहकांची संपूर्ण माहिती दिसू लागली. 


बँकेने नेमकं काय सांगितलं?


आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना बुधवारी संध्याकाळापासून या अडचणीचा सामना करावा लागत होता. याची चर्चा समाजमाध्यमांवरही चालू होती. त्यानंतर बँकेने झालेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय. चुकीच्या पद्धतीने मॅपिंग झाल्यामुळे जुन्या ग्राहकांना नव्या ग्राहकांची माहिती दिसत होती, असं बँकेने म्हटलंय. बँकेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या एकूण ग्राहकांपैकी फक्त 0.1 टक्के ग्राहकांनाच अशी अडचण आली आहे. बँकेने नव्या ग्राहकांचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले असून त्यांना आता नवे क्रेडिट कार्ड दिले जाणार आहेत. झालेल्या चुकीमुळे कोणीही माहितीचा दुरुपयोग केलेला नाही. तसे प्रकरण आमच्या समोर आलेले नाही. तरी कोणाला आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची भरपाई करू, असेही बँकेने म्हटले आहे.  


महिंद्रा बँकेवर  आरबीआयची कारवाई


दरम्यान, जुन्या ग्राहकांना नव्या ग्राहकांची सर्व माहिती दिसली असली तरी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. कारण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करायचा असल्यास, ग्राहकांना ओटीपी विचारला जातो. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. आयटी नियमांचे उल्लंघन न केल्यामुळे या बँकेला ऑनलाईन पद्धतीने नवे ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या बँकेला नव्याने क्रेडिट कार्ड जारी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या एक दिवस अगोदर आयसीआयसीआय बँकेतील ही तांत्रिक बिघाड समोर आली होती. 


हेही वाचा :


SBI चा शेअर भलताच खातोय भाव, तुम्हीही होऊ शकता मालामाल! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?


30 हजार रुपये गुंतवा अन् व्हा 5 कोटींचे मालक, जाणून घ्या करोडपती बनवणारा SIP चा 'हा' फॉर्म्यूला!


मतदान करा, सवलत मिळवा! मतदारासांठी फ्लाइट ते जेवणापर्यंत खास सूट, सविस्तर माहिती एका क्लिकवर