RBI Meeting: वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले जात असताना महागाई (Inflation) आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा गृह कर्जासह इतर कर्जे महाग (Loan Interest rate) होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India) आज व्याज दर वाढीची घोषणा करू शकते. आरबीयआयची आज विशेष बैठक आज, गुरुवारी पार पडत आहे. बुधवारी रात्री अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली. त्या पार्श्वभूमीवर आज आरबीआयची पतधोरण आढावा समितीची बैठक पार पडत आहे.
या बैठकीत आरबीआयचे व्याज दर निश्चित करणारे पॅनलदेखील असणार आहे. या बैठकीत महागाईचा दर 6 टक्क्यांपेक्षा कमी का झाला याबाबत आरबीआय केंद्र सरकारला स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, महागाईला आटोक्यात ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर भारतातही व्याज दर वाढीची शक्यता वाढली आहे.
आरबीआयच्या MPC ची मागील विशेष बैठक 2016 मध्ये पार पडली होती. आरबीआयची मागील बैठक 28-30 सप्टेंबर 2022 दरम्यान पार पडली होती. आरबीआयने 30 सप्टेंबर रोजी रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे रेपो दर 5.9 टक्के इतका झाला होता. त्यामुळे कर्जे आणखी महाग झाली होती. या बैठकीत आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रेपो दरात वाढ झाल्यास कर्जे महाग होणार आहेत. तर, मुदत ठेवीवरीलही व्याज वाढणार आहे.
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईत वाढ
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली होती. देशाचा किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 7.41 टक्क्यांवर पोहचला होता. याआधी, किरकोळ महागाई दर हा ऑगस्टमध्ये 7.0 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यापूर्वी जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.71 टक्के इतका झाला होता.
अमेरिकेत व्याज दरवाढ
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ कतेली आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. सलग चौथ्यांदा व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेत रेपो दर 4 टक्के झाला असून 2008 नंतर हा सर्वाधिक व्याज दर आहे. अमेरिकेत मागील चार दशकातील सर्वाधिक महागाईची नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: