एक्स्प्लोर

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट जैसे थे, होम लोनचा हप्ता वाढणार की कमी होणार?

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट जाहीर केला.

RBI Repo Rate: देशभरातील गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाची बुधवारी घोषणा करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि संचालकांची बैठक सुरु होती. या बैठकीअंती रिझर्व्ह बँकेने सध्याच्या रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो रेट 5.5 टक्के कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने सलग गेल्या दोन पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यामुळे आताच्या पतधोरणातही रेपो रेट आणखी कमी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, रिझर्व्ह बँकेने रेपो (RBI) रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर देशभरातील बँकांनी त्यांच्या गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर घटवले होते. त्याचा सर्वसामान्यांना कितपत फायदा झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. याशिवाय, अलीकडच्या काळातील महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. रिझव्ह बॅकेने रेपो रेट जैसे थे ठेवल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात आणि हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. यापूर्वी जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट सहा टक्क्यांवरुन 5.50 टक्क्यांपर्यंत खाली आला होता.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत सोनं तीन हजारांनी ‌‌‌‌‌‌‌वधारलं; तर चांदी प्रतितोळ्याचा दर काय?
सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत सोनं तीन हजारांनी ‌‌‌‌‌‌‌वधारलं; तर चांदी प्रतितोळ्याचा दर काय?
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा, प्रताप सरनाईक यांचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा, प्रताप सरनाईक यांचे निर्देश
Gold and Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 4 हजारांनी तर, चांदी 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 4 हजारांनी तर, चांदी 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Pune Shivajinagar Mandar Kiwale Case: आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Embed widget