Realme C35 Smartphone : Realme ने आणखी एक बजेट फेंडली स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Realme C35 आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे दोन प्रकार लॉन्च केले आहेत. तसेच, हा स्मार्टफोन दोन कलरमध्येदेखील उपलब्ध करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे फीचर्स, ऑफर्स आणि किंमत.
या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात AI सह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनच्या परफॉर्मन्ससाठी यामध्ये T616 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4 GB RAM आणि 64 GB इंटर्नल मेमरी आणि 4 GB RAM आणि 128 GB इंटर्नल मेमरीसह लॉन्च करण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि त्यात 3 स्लॉट दिले गेले आहेत, म्हणजे सिम आणि एक मेमरी कार्ड दोन्ही एकाच वेळी स्थापित केले जाऊ शकतात. स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी बाजूला फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच चार्जिंगसाठी 18W क्विक चार्जला सपोर्ट करते.
realme C35 Google च्या Android 11 Base UI R Edition वर काम करते. हा स्मार्टफोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ग्रीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे, तर 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. Realme च्या वेबसाईटवरून खरेदी केल्यास 100 रुपयांची सूट दिली जात आहे, तर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास पाच टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. याशिवाय क्रेडिट कार्डने 451 रुपये प्रति महिना हप्त्यावर खरेदी करता येईल.
महत्वाच्या बातम्या :
- Jio Airtel,आणि Idea वर मिळतोय सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन, तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लॅन कोणता ते जाणून घ्या...
- Samsung Galaxy F23 5G : लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, 'हे' असतील फिचर्स
- OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha