Fraud Alert RBI: देशभरात सध्या बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगत किंवा ओटीपी मागत आपल्या खात्यावरुन पैसे काढल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. केवायसी, कागदपत्रे असूनही अनेकदा अनियमीत प्रकरणांमध्ये नाव गोवलं जातं आणि फसवणूक होते. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांना फरवणूकीपासून सावध केले आहे.मध्यवर्ती बँकेने लोकांना त्यांचे खाते लॉगिन तपशील, OTP किंवा KYC कागदपत्रे अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करू नयेत असे सांगितले. आरबीआयने नुकतेच एका निवेदनात म्हटले आहे की अनियमिततांमध्ये गुंतलेले काही घटक त्याचे नाव वापरून जनतेची फसवणूक करण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत.


यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी अवलंबलेल्या पद्धतीदेखील सांगण्यात आल्या आहेत. फसवणूक करणारे खोटे RBI लेटर हेड  आणि बनावट इमेल तसेच पत्ता वापरतात. रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी असल्याचं भासवतात. तसेच लॉटरी जिंकणे, मनी ट्रान्सफर, परदेशी पैसे पाठवणे आणि सरकारी योजनांच्या नावावरून बनावट ऑफर देत लोकांची फसवणूक करतात.


भूलथापांना बळी पडू नका


मध्यवर्ती बँकेने सांगितले, आणखी एक हलचाल आमच्या लक्षात आली आहे. फसवणूक करणारे लहान, मध्यम व्यवसायिकांना सरकारी अधिकारी असल्याचं सांगत आकर्षक पेमेंटचे आश्वासन देत सरकारी करार किंवा योजनेच्या नावाखाली पैसे सुरक्षीत ठेव म्हणून भरायला सांगातात.


कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका


फसवणूक करणारे धमकावणारे डावपेचही करतात. ज्यात फसवणूकीचं लक्ष्य बनवण्यासाठी SMS किंवा Email च्या माध्यमातून संपर्क साधला जातो. यात संबंधित व्यक्तीचं बँकखातं गोठवण्यासाठी त्यांना धमकी देण्यात येते. तसेच काही जण वैयक्तीक तपशील सामाजिक करण्यासाठीही मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडतात.


संशयास्पद वाटल्यास बँकेत जाऊन खात्री करा


आरबीआयने म्हटले आहे की काही वेबसाइट्स आणि ॲप्सच्या निदर्शनास आले आहे, ज्यामध्ये अनधिकृत डिजिटल कर्ज देणारे ॲप्स आणि इतर कथित वित्तीय सेवा प्रदात्यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. मध्यवर्ती बँकेने जनतेला संशयास्पद संप्रेषणे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना कळवण्याचा सल्ला दिला.


हेही वाचा:


Post Office मधील कोणत्या योजनेत किती टक्के परतावा? सर्वाधिक फायदा कोणत्या योजनेत?