Post Office Investment Scheme : सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणुकीचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजना. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अशा अनेक योजना राबवण्यात येतात की ज्या माध्यमातून मोठा फायदा मिळवता येतो. त्याचसोबत आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहते असाही विश्वास त्यामागे असतो. 


सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस योजनांवर उपलब्ध व्याजात सुधारणा करते. सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 च्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत कोणत्याही योजनेतील व्याजदरात बदल केले नव्हते. आता पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये, 1 ऑक्टोबर रोजी पोस्टांच्या व्याजदरात पुन्हा एकदा सुधारणा होण्याची शक्यता आहे. 


गेल्या बऱ्याच काळापासून केंद्र सरकारने पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे या व्याजदरात यंदा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर पोस्टाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.


Post Office Investment Scheme Interest Rate : पोस्टाच्या कोणत्या योजनेत किती व्याजदर मिळतो? 


Post Office Savings Account- 4 टक्के



  • 1 वर्षाची मुदत ठेव - 6.9 टक्के 

  • 2 वर्षांची मुदत ठेव - 7.0 टक्के

  • 3 वर्षांची मुदत ठेव - 7.1 टक्के

  • 5 वर्षांची मुदत ठेव - 7.5 टक्के

  • 5 Year Recurring Deposit Account- 6.7 टक्के

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 8.2 टक्के

  • मासिक उत्पन्न योजना MIS - 7​.4 टक्के

  • Public Provident Fund Scheme- 7.1 टक्के

  • ​सुकन्या समृद्धी योजना - 8.2​​​ टक्के

  • National Savings Certificates - 7.7 टक्के

  • किसान विकास पत्र - 7.5 टक्के

  • Mahila Samman Savings Certificate - 7.5 टक्के


वरील योजनांपैकी काही योजना हा इतर बँकांमध्येही उपलब्ध होतात. पण काही योजना या फक्त पोस्ट ऑफिसमध्येच उपलब्ध होतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट, मंथली इनकम स्कीम या अशा योजना आहेत ज्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.


नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि  महिला सन्मान बचत सर्टिफिकेट (MSSC) दोन्ही मुदत ठेवींप्रमाणे आहेत. कोणताही भारतीय नागरिक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये  5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. तर महिला सन्मान बचत सर्टिफिकेट योजना ही महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालवली जाते. या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. 


तर MIS योजना ही दरमहा नियमित उत्पन्न देणारी योजना आहे. या योजनेत, एका खात्यावर जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ही रक्कम 5 वर्षांसाठी ठेवली जाते. यावर 7.4 टक्के दराने पैसे दिले जातात.


ही बातमी वाचा :