Banking New Rules : खासगी क्षेत्रातील बँकांच्या दृष्टीने एक महत्वाची बाती आहे. खासगी बँकांच्या संदर्भातील काही नियम 1 जुलैपासून बदलणार आहेत. एकीकडे, एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डबाबत काही नियम बदलले आहेत, तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेने काही व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्कही बदलले आहे. ते नेमके कोणते बदल आहेत? त्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
एचडीएफसी बँकेच्या नियमांमध्ये बदल
जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन एमपीएल, ड्रीम 11 सारख्या गेमिंग अॅप्सवर दरमहा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला त्यावर एक टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही मोबिक्विक, पेटीएम, ओला मनी आणि फ्रीचार्ज सारख्या थर्ड पार्टी वॉलेटवर महिन्यात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवले तर त्यावरही एक टक्के शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही इंधनावर 15 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर अतिरिक्त एक टक्के शुल्क भरावे लागेल. याशिवाय, जर तुम्ही वीज, पाणी आणि गॅसवर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले तर त्यावरही एक टक्के शुल्क भरावे लागेल.
ICICI बँकेच्या नियमांमध्ये बदल
खासगी क्षेत्रातील आणखी एका मोठ्या बँकेने ICICI बँकेने IMPS आणि ATM वर आकारण्यात येणाऱ्या काही शुल्कात बदल केले आहेत. यानंतर, जर तुम्ही आता इतर कोणत्याही बँकेचा वापर केला तर तुम्हाला त्यावर काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. म्हणजेच, मेट्रो शहरांमध्ये, तुम्हाला दरमहा तीन मोफत व्यवहार मिळतील. तर लहान शहरांमध्ये, तुम्हाला पाच पर्यंत मोफत व्यवहार दिले जातील. यानंतर, जिथे पूर्वी पैसे काढण्यासाठी 21 रुपये आकारले जात होते, तिथे आता तुम्हाला 23 रुपये शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही फक्त शिल्लक तपासली किंवा आर्थिक नसलेले काम केले तर त्यावर प्रति व्यवहार 8.5 रुपये शुल्क आकारले जाईल.
याशिवाय, आता IMPS द्वारे पैसे पाठवण्यासाठी म्हणजेच त्वरित सेवेसाठी तुम्हाला तुमच्या व्यवहारानुसार शुल्क भरावे लागेल. जसे की 1 हजार रुपयांसाठी प्रति व्यवहार 2.5 रुपये, तर 1 हजार ते 1 लाख रुपयांसाठी प्रति व्यवहार 5 रुपये. तर 1 लाख ते 5 लाख रुपयांसाठी प्रति व्यवहार 15 रुपये द्यावे लागतील.
महत्वाच्या बातम्या:
Tatkal Ticket Booking Rules : मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा