Gold Rate In India : सराफा बाजारात सासत्यानं सोन्याचे दर (Gold Rate)  कमी जास्त होत आहेत. दर कमी जास्त होण्याला विविध कारणे देखील आहेत.  भू-राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे आज पुन्हा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. चीन आणि स्वित्झर्लंडनंतर भारत हा सोन्याचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आणि दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारत आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो.

सोन्या चांदीचे दर काय?

सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये निश्चित असल्याने, विनिमय दरांमधील चढ-उतारांचा भारतातील सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम होतो. दरम्यान, यूएस फेड रिझर्व्हने देखील व्याजदर 4.25 ते 4.50 टक्के बेंचमार्कवर अपरिवर्तित ठेवले आहेत. ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. यामुळेच आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 101090 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 92660 रुपये आहे आणि 18 कॅरेटची किंमत प्रति 10 ग्रॅम 75820 रुपये आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत देखील थोडी वाढली आहे.

तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती ? 

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 101220 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92810 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 75940  रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 101090 रुपये आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 92660 रुपये आणि 75820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 101090रुपये आहे. आज येथे 22कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 75820 रुपये आहे. चेन्नईमध्ये आज 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अनुक्रमे 101090  रुपये, 92660  रुपये आणि 76260 रुपये आहे. हैदराबाद आणि अमरावतीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 101090 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92660 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 75820 रुपये आहे. बंगळुरूमध्येही आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 101090 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92660 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 75820 रुपये आहे. आज अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 100980 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 92710 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 75860 रुपये आहे.

चांदीच्या दरातही वाढ

आज दिल्ली, बंगळुरू, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, गाझियाबादमध्ये चांदीचा दर प्रति किलो 112100 रुपये आहे. तर, हैदराबाद, चेन्नईमध्ये आज चांदीचा दर 122100 रुपये आहे. भोपाळमध्ये चांदीचा दर प्रति किलो 111200 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या:

Gold Rate News : इस्त्रायल- इराण वादाचा भडका, सोनं एका दिवसात 2000 रुपयांनी महागलं, सोन्याचे दर पुन्हा 1 लाखांच्या पार