मुंबई: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर आहेत, अशात आता आरबीआयने आपली बँक हॉलिडे लिस्ट (RBI Bank Holidays List In January 2024) अपडेट केली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात 16 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत ज्यांना बँकेत जाण्याची गरज आहे त्यांनी बँकेच्या सुट्टीची यादी एकदा तपासून पाहावी. तथापि बँक ग्राहकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की ज्या दिवशी बँका बंद असतील, त्या दिवशी मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंग यासारख्या डिजिटल सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालू राहतील.
जर आपण जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांबद्दल विचार केला तर या महिन्यात 4 रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार अशा एकूण 6 सुट्ट्या सामान्य आहेत. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत. मकर संक्रांतही 14 जानेवारीला आहे. 11 जानेवारी रोजी मिशनरी डे निमित्त देशात काही ठिकाणी बँका बंद राहतील. अनेक राज्यांमध्ये त्यांचे काही स्थानिक सण साजरे केले जातात, त्या दिवशी त्या त्या ठिकाणच्या बँका बंद राहतील.
RBI बँक सुट्ट्यांचे तीन प्रकारांमध्ये विभागणी करते. त्यामध्ये हॉलिडे अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स अॅक्ट, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक क्लोजिंग ऑफ अकाऊंट्सचा समावेश असतो.
जानेवारीत या दिवशी बँका बंद राहतील
- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला बँका बंद राहतील.
- रविवारी 07 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहतील.
- 13 जानेवारीला दुसऱ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहतील.
- रविवारी, 14 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
- सोमवार, 15 जानेवारी रोजी, उत्तरायण पुण्यकाळ, मकर संक्रांती, पोंगल, बिहू निमित्त देशभराती बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यासह अनेक ठिकाणच्या बँका बंद राहतील.
- रविवारी, 21 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार, 26 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
- 27 जानेवारीला चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहतील.
- रविवार, 28 जानेवारी रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
जर एखाद्याला प्रत्यक्षात बँकेमध्ये जाऊन काम करायचं असेल त्याच्यासाठी ही सुट्ट्यांची यादी महत्त्वाची आहे. वरील दिवस सोडून इतर दिवशी बँका सुरू राहतील.
बँक बंद असताना असे काम पूर्ण करा
बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. अशा परिस्थितीत दीर्घकाळ बँका बंद असल्यानं ग्राहकांची अनेक महत्त्वाची कामं रखडली आहेत. पण बदलत्या तंत्रज्ञानामुळं अनेक कामं सोपी झाली आहेत. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग वापरु शकता. UPI च्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करता येतात. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.
ही बातमी वाचा :