Fake App :  लोकांची वैयक्तिक माहिती गोळा (Fake App) करण्यासाठी आणि डिव्हाइसला हानी पोहोचवण्यासाठी बनावट अॅप्स विकसित केले जातात. निरपराध लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ते योग्य कामासाठी बनवले जातात, जेणेकरून वापरकर्त्यांचा त्यांच्यावर सहज विश्वास बसेल. मात्र, नंतर हेच अॅप्स आपला खिसादेखील खाली करु शकतात. तुमच्या फोनमध्ये फेक अॅप इन्स्टॉल केल्यास ते तुमच्या अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवेल, सतत जाहिराती दाखवेल आणि तुमची खासगी माहिती चोरेल.


फेक अॅप्स अनेक प्रकारे युजर्सपर्यंत पोहोचवले जातात. काही वेळा ते गुगल प्ले स्टोअरसारख्या नामांकित अॅप स्टोअर्सवरही अपलोड केले जातात. सुरुवातीला ते ठीक असतात पण नंतर सायबर गुन्हेगार आपला कोड बदलतात. यामुळे हे अ ॅप्स धोकादायक ठरतात आणि ते इन्स्टॉल करणे धोक्यापासून मुक्त नसते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही हे फेक अ ॅप्स कसे ओळखू शकता.


फेक अॅ्प्स कसे ओळखावे?



फेक अॅप्सच्या विळख्यात अडकणे हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही एखादे अॅप डाऊनलोड करत असाल तर आधी त्याची ओरिजिनॅलिटी तपासून पहा. अशा प्रकारे तुम्ही फेक अॅप ओळखू शकता.


रिव्ह्यू तपासा :


एखाद्या अॅपला कमी रिव्ह्यू मिळाले असतील आणि त्याविरोधात खूप तक्रारी आल्या असतील तर सावध व्हा. लक्षात ठेवा की अनेक अॅप्सवरदेखील रिव्हू दिले जातात. ते रिव्हू त्यांनी स्वत:चं जनरेट केलेल्या असतात. त्यामुळे या अॅप्सधोकादायक ठरू शकतात. फेक अॅप डेव्हलपर्स लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी फेक रिव्ह्यूचा वापर करतात.


माहितीतील चुका-


चांगलं आणि सुरक्षित असलेलं अॅप डेव्हलपर्स आपल्या अॅपच्या वर्णनाबाबत खूप सावध असतात. त्यांच्या पेजवर व्याकरण किंवा स्पेलिंग वगैरेच्या चुका आढळणार नाहीत. अ ॅप डिस्क्रिप्शनवर टायपो, एरर, व्याकरण किंवा स्पेलिंगच्या चुका वगैरे दिसल्यास सावध व्हा. फेक अॅपवर 


डाऊनलोड नंबर-


ओरिजिनल अॅप्स जगभरात डाऊनलोड केले जातात. डाऊनलोडची संख्या अनेक लाख, अगदी कोट्यवधींमध्येही असू शकते. एखाद्या लोकप्रिय अॅपचा डाऊनलोड नंबर तुम्हाला फक्त काही हजारांचा दिसला तर ते फेक आहे हे समजून घ्या.


अॅप डाऊनलोड करताना काळजी घ्या-


सध्या अनेक फेक अॅप्स गुगल प्ले सोअरवरुन डिलीट करण्यात आल्या आहे. या अॅप्स लोकांनी खासगी माहिती चोरून त्याचा गैरवापर करत असल्याचं समोर आलं होतं. त्यासोबतच आर्थिक फसवणूक करत असल्याचंदेखील समोर आलं होतं. त्यामुळे कोणतंही अॅप डाऊनलोड करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज 'या' दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर