RBI Cashless Withdrawals : भारतामध्ये बँकिंग क्षेत्रात वेगाने डिजिटलायझेशन झाले. कोरोना काळात तर भारतात डिजिटलायझेशन आणखी फोफावले. पहिल्यांदा आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत होते, नंतर एटीएम कार्डच्या रांगेत उभं राहून पैसे काढू लागलो. त्यासाठी डेबिट/रुप-वे कार्डचा वापर केला जाऊ लागला. पण आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्डची गरज भासणार नाही. कारण देशात आता कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. आरबीआयने त्यासाठी पावले उचलली आहेत. कोणत्याही बँकेच्या एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत. (RBI allows cashless withdrawals across all ATMs)


मौद्रिक नीतीच्या समिक्षा बैठकीदरम्यान आरबीआयचे गवर्नर शशीकांत दास यांनी सांगितले की, यूपीआयचा वापर करत एटीएममधून बिना कार्डचे पैसे काढता येण्याच्या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही सुविधा देशातील सर्व बँकांसाठी लागू होणार आहे.  सरकारी बँक असो वा खासगी, प्रत्येक बँकेचा ग्राहक ही सुविधा वापरु शकेल. दरम्यान, देशाला कॅशलेस बनवण्यासाठी आरबीआयकडून आवश्यक पाऊले उचलण्यात येणार आहे. पेमेंट सिस्टीममध्ये सुधारणा करुन जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित, सुलभता आणि क्षमतेएवढे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा येणार आहे.


सुरुवातीला या बँकांना दिली जाणार सुविधा –
सुरुवातीला भारतीय स्टेट बँक (SBI), ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि RBL बँक आपल्या ग्राहकांना डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा वापर न करता एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधा दैनंदिन व्यवहाराची मर्यादा दहा हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.


कार्डशिवाय कसे काढाल पैसे? (How to withdraw cash without ATM/debit cards)
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचं उदाहरण पाहूयात... एसबीआय खातेधारकांना योनो अ‍ॅपमध्ये लॉग इन करावे लागते. त्यानंतर योनो कॅशवर क्लिक करावे.  त्यानंतर एटीएम सेक्शनमध्ये जा... एटीएममधून जितकी रक्कम काढायची ती नोंदवा.. त्यानंतर एसबीआयकडून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक क्रमांक पाठवेल. एसबीआयच्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी त्या क्रमांकाचा आणि पिन क्रमांकाचा वापर करा.  एसबीआय एटीएममध्ये पहिल्यांजा पेज कार्ड हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर योनो कॅश हा पर्याय निवडा...त्यानंतर सर्व माहिती भरावी लागते...