Sanjay Raut : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं प्रेझेंटेशन भाजपने तयार केले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माझा हा गौप्यस्फोट नसून, हे सत्य आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले. या कटाचे सुत्रधार भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आहेत. त्यांच्यासोबत वारणसीमधील एक व्यक्ती आणि मुंबईतील भाजपशी संबधीत एक मोठा बिल्डर असल्याचे राऊत म्हणाले. यासाठी पैसे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले.


 






किरीट सोमय्या दोन कारणांसाठी दिल्लीत जातात. एक म्हणजे खोटे कागद घेऊन जातात, दुसरे म्हणजे मुंबई केंद्रशासीत प्रदेश करण्यासंदर्भात त्यांचे कारस्थान सुरु आहे. मुंबईतील काही धनिक, बिल्डर यांच्या संगनमताने सोमय्या हे नेतृत्व करत आहेत. मुंबई कशी केंद्रशासीत करता येईल याचे प्रेझिंटेशन त्यांनी तयार केले आहे. त्यांना मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे. मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे. हा महाराष्ट्रद्रोह असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.


मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात सोमय्यांसह काही जणांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिले आहे. या कटात मुंबईतील काही धनिक, भाजपचे काही लोक यांच्या संगनमताने सोमय्या नेतृत्व करत आहेत. काही करुन त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे. हे सगळे महाराष्ट्रद्रोही असल्याचे राऊत म्हणाले. 


यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. किरीट सोमय्यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा असेही राऊत यावेळी म्हणाले. पैसे गोळा झाले की नाही हा माझा साधा सवाल असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवत आहात. भाजपचे प्रमुख लोकं जर किरीट सोमय्यांचे समर्थन करत असतील तर कश्मीर फाईलप्रमाणे त्यांची सुद्धा विक्रांत फाईल तयार करावी लागेल असेही राऊत यावेळी म्हणाले. देशद्रोहाचे समर्थन करु नका असेही ते म्हणाले.