RBI Action : रिझर्व्ह बँकेनं (RBI) देशातील पाच बँकांवर मोठी कारवाई (RBI Action) केली आहे. विविध नियामक नियमांचे उल्लंघन केल्यामुळं RBI ने ही कारवाई केली आहे. देशातील पाच बँकांना 60.03 लाखांचा दंड ठोठावला आहे. RBI ने दिलेल्या विविध सुचनांचे पालन न केल्यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे. जाणून घेऊयात कोणत्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.  


या बँकांवर केली कारवाई 


आरबीआयने राजकोट नागरीक सहकारी बँकेला तब्बल 43.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नवी दिल्लीतील कांगडा सहकारी बँक, लखनौमधील राजधानी नगर सहकारी बँक, उत्तराखंडमधील सहकारी बँक, गढवाल या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकी तिन्ही बँकांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचबरोबर डेहराडून जिल्हा सहकारी बँकेला देखील दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. या सर्व बँकांनी रिझर्व्ह बँकांने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे. 


नियमांचे उल्लंघन केलेल्या सर्व बँकांवर कारवाई 


नियमांचे उल्लंघन केलेल्या सर्व बँकांवर कारवाई करण्यात येत आहे. नुकतीच RBI ने मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक (Sarvodaya co op bank) आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या (National Urban Co-operative Bank Ltd) विरोधात कारवाई केली आहे. या बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. खातेधारकांना खात्यातून केवळ 15 हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेच्या खातेधारकांना 10 हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत. 


देशातील अनेक बँका आर्थिक संकटात


सध्या देशातील अनेक बँका आर्थिक संकटात आहेत. या बँका संकटातून बाहेर निघण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अशा बँकांवर देखील आरबीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे. आर्थिक संकटात असलेल्या बँकांतून पैसे काढण्यावर देखील काही निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, काही बँकांनी बँकिंग नियामकाच्या नियमांच्या तरतुदींचे पालन केलं नाही. त्या बँकांनी तरतूदीचं उल्लंघन केल्यामुळे या सहकारी बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. यापूर्वी, RBI ने नियमांचे पालन न केल्याबद्दल आठ सहकारी बँकांवर दंड ठोठावला होता. या विशाखापट्टणम सहकारी बँकेला सर्वाधिक 55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या:


RBI ची मोठी कारवाई, 'या' दोन बँकातून पैसे काढण्यावर निर्बंध, नेमकं प्रकरण काय?