सांगली : सांगली लोकसभेचे मविआचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आज (19 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. दुसरीकडे, विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असल्याने काँग्रेसचे कोण कोण नेते उपस्थित राहणार? याकडे लक्ष लागले आहे. चंद्रहार पाटील यांचा उमदेवारी अर्ज भरण्यापूर्वी सकाळी 11 वाजता जुना स्टेशन चौक ते मारुती चौक या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे. मारुती चौकात मारुतीरायाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन चंद्रहार पाटील अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. 


काँग्रेसचे कोण कोण नेते उपस्थित राहणार?


चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरतेवेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत यासह आमदार अरुण अण्णा लाड, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, रोहित पाटील, नितीन बानुगडे पाटील हे नेते उपस्थित राहणार असल्याचे कळवण्यात आलं आहे. मात्र, सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादामुळे आज काँग्रेसचे कोण कोण नेते चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहतात, याची उत्सुकता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या