सांगली : वसंतदादांनी चांगले कारखाने काढले. मात्र, या कारखान्याचे वाटोळं कोणी केलं? आज दुसऱ्याला साखर कारखाना चालवायला देता? कारखाना चालवण्याची तुमच्यामध्ये धमक नाही का? आम्ही चांगल्या पद्धतीने साखर कारखाने चालवून दाखवतो. वसंतदादा बँकेची काय अवस्था करून ठेवली? सांगली जिल्ह्यात एवढी आर्थिक सुबत्ता होती की आम्ही सांगलीचे नेहमी उदाहरण द्यायचो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते आणि सांगली लोकसभेला बंडखोरी केलेल्या विशाल पाटील (Ajit Pawar on Vishal Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. 


कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघाला


सांगली भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शेतकरी सकारी साखर कारखाना म्हणून वसंतदादा सहकारी साखर कारखाना ओळखला जायचा. परंतु, हा कारखाना आता कोणतरी धारू आहे आणि तो धारू कारखाना चालवतो आणि आम्ही बघत बसतो ही तुमची परिस्थिती आहे. तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघाला याचा कुठेतरी विचार करा, असा टोला अजित पवार यांनी लगावला. 


त्यांनी सांगितले की, तुम्ही दुसऱ्याला चालवायला कारखाने देता, पण साखर कारखाना चालवायची तुमच्यामध्ये धमक नाही. आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो, बँकांचं काय केलं? आज काय स्थिती आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 


संजय पाटील यांचीही टीका


संजय पाटील म्हणाले की, सांगलीत दोन दिवसापूर्वी एक अपक्ष अर्ज भरला, त्यांना मी लहान असल्यापासून बघतो. राजकारणात परिपक्व नसलेलं नेतृत्व  म्हणून आपण सगळी बघतो. त्यांनी मोठं मोठ्या वल्गना केल्या, घोषणा केल्या. त्यांनी मुलांना ओरडायला लावलं, असा आरोपही संजयकाका पाटील यांनी केला. पहिले आठ दहा दिवस वातावरण तापत नसल्याने लोकांना वाटायचं आपला पैलवान गरीब आहे, पण आपलं इलेक्शन अगदीच सोपं आहे. त्यामुळे लोक म्हणाले शिस्तीत होऊदे. दोन दिवसापूर्वी अर्ज भरला, लोकांचे फोन येऊ लागले अर्ज कधी भरणार, आम्ही आमच्या गाड्या घेऊन येणार आहे एवढ लोकांच प्रेम असल्याचे संजय पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या