Ratan Tata 26 companies List : देशातील एक मोठे आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन (Ratan Tata passed away) झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यंसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतभर शोककळा पसरली आहे. पण रतन टाटा यांच्या 26 सूचीबद्ध कंपन्या (Ratan Tata 26 companies) या गुंतवणूकदारांना (investors) त्यांची आठवण करुन देत राहतील. कारण या कंपन्यांनी अनेक गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलं आहे. जाणून घेऊयात त्यांच्या 26 लिस्टेड कंपन्या कोणत्या? 


रतन टाटा आज आपल्यात नाहीत पण शेअर बाजारातील गुंतवणूकदार त्यांच्या 26 लिस्टेड कंपन्या कायम आठवणीत ठेवतील. या 26 कंपन्या गुंतवणूकदारांसाठी वरदान आहेत. कारण देशातील करोडो गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये मोठ्या पैसे गुंतवले आहेत. कारण त्यांना विश्वास आहे की या कंपन्या त्यांच्यासाठी कधीही तोट्याच्या ठरणार नाहीत. रतन टाटांच्या स्पेशल 26 नेही सर्वसामान्यांच्या या विश्वासाला तडा गेला नाही. मग ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस असो किंवा टाटा मोटर्स. या यादीत टाटा स्टील, टाटा कंझ्युमर, टाटा टेक, टाटा केमिकल्स कंपन्यांची नावे घेता येतील. टाटा समूहाच्या या 26 कंपन्यांची नावे काय आहेत हे जाणून घेऊयात.


रतन टाटा 26 सूचीबद्ध कंपन्या कोणत्या?


1) टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअरमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 1,959 रुपयांवर व्यवहार करत आहे.
2) ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1.29 टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीचे शेअर्स 8,114 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
3) टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 0.18 टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीचा शेअर 937.5 रुपयांवर व्यवहार करत आहे.
4) टोयो रोल्सच्या शेअर्समध्ये 0.84 टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीचा शेअर 91.01 रुपयांवर व्यवहार करत आहे.
5) टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 7,269 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
6) Tata Elxsi च्या शेअर्समध्ये 3.20 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 7,855 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
7) टाटा केमिकल्सच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीचे शेअर्स 1,172 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
8) नेल्कोच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांनी वाढ होत असून कंपनीचे शेअर्स 1,026 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
9) टाटा टेकच्या शेअर्समध्ये 2.46 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 1,075 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
10) टायटनच्या शेअर्समध्ये 0.73 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 3,520 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
11) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 0.52 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 4,274 रुपयांवर व्यवहार करत आहे.
12) इंडियन हॉटेलच्या शेअर्समध्ये 2.13 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 708.4 रुपयांवर व्यवहार करत आहे.
13) व्होल्टासच्या शेअर्समध्ये 0.75 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 1,799 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
14) टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 1.13 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 160.8 रुपयांवर व्यवहार करत आहे.
15) ओरिएंटल हॉटेल्सच्या शेअर्समध्ये 0.25 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 177.7 रुपयांवर व्यवहार करत आहे.
16) बनारस हॉटेल्सच्या शेअर्समध्ये 0.74 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 8,380 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
17) टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये 2.84 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 474.0 रुपयांवर व्यवहार करत आहे.
18) रॅलिस इंडियाच्या शेअर्समध्ये 3.11 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 323 रुपयांवर व्यवहार करत आहे.
19) ऑटोमोबाईल कॉर्प गोवाच्या शेअर्समध्ये 2.60 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचा शेअर 2,594 रुपयांवर व्यवहार करत आहे.
20) टीआरएफच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 528 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
21) ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंबलिंगच्या शेअर्समध्ये 0.89 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे आणि कंपनीचा शेअर 739.5 रुपयांवर व्यवहार करत आहे.
22) टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरमध्ये 7.50 टक्क्यांनी वाढ होत असून कंपनीचा शेअर 85.15 रुपयांवर व्यवहार करत आहे.
23) टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअर्समध्ये 0.53 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 1,124 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
24) आर्टसन इंजिनिअरिंगचे शेअर्स सध्या शेअर बाजारात व्यवहार करत नाहीत. कंपनीचे शेअर्स अखेरचे रु. 182.10 वर दिसले होते.
25) तेजस नेटवर्कच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ दिसून येत असून कंपनीचे शेअर्स 1,213 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
26) टाटा मोटर्स डीव्हीआरचे शेअर्सही बाजारात व्यवहार करत नाहीत. कंपनीचे शेअर्स शेवटचे 765.15 रुपये होते.


महत्वाच्या बातम्या:


Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले