एक्स्प्लोर

Tata Projects: मंदीच्या सावटात टाटामध्ये काम करण्याची संधी, फ्रेशर्ससाठी 400 जागांवर भरती

Tata Projects Freshers Hiring: जगभरात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक मोठ्या कंपन्या या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूह नवीन लोकांना नोकरीची संधी देत आहे.

Tata Projects Freshers Hiring: जगभरात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक मोठ्या कंपन्या या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूह नवीन लोकांना नोकरीची संधी देत आहे. टाटा समूहाची Engineering Procurement & Construction (EPC) शाखा असलेल्या Tata Projects या वर्षी देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी देणार आहे.

टाटा प्रोजेक्ट्सचे (Tata Projects) मुख्य एचआर अधिकारी गणेश चंदन यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects) 2022-23 मध्ये सुमारे 400 नवीन पदवीधरांना नोकरीची संधी देणार आहे. या नियुक्त्यांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) मधील 255 पदवीधर असतील. डिप्लोमाधारकांना इतर सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधून नोकरीची संधी देण्यात येणार आहे. टाटा ग्रुपने 2021-22 मध्ये टाटा प्रोजेक्टद्वारे 250 पदवीधरांची भरती केली होती. ज्यामध्ये IIT आणि NIT मधील सुमारे 80 पदवीधरांना संधी मिळाली होती.

गणेश चंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा प्रोजेक्ट (Tata Projects Freshers Hiring) कंपनी अभियांत्रिकी कॅम्पसच्या माध्यमातून नवीन टॅलेंटला संधी देत आहेत. गेल्या पाच वर्षांत कंपनीने 1,000 पदवीधर अभियंते आणि विज्ञान पदवीधरांना 5,700 कायमस्वरूपी कामावर रुजू केलं आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले आहेत की, आम्हाला देशांतर्गत प्रतिभा वाढवायची आहे. कॅम्पसमध्ये भरती करणारे बहुतेक अभियंते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांमधील आहेत. चंदन यांच्या  म्हणण्यानुसार, कंपनी प्रीमियर इन्स्टिट्यूटमधील नवीन अभियंत्यांना दरवर्षी सुमारे 17 लाख रुपये देते.

यामध्येच दरवर्षी कंपनी अभियांत्रिकी संस्थांमधून महिलांचीही नियुक्ती करत आहे आणि यावर्षी त्यांची संख्या सुमारे 25 टक्के आहे. कंपनीत पाच वर्षांपूर्वी सुमारे 4,000 कर्मचार्‍यांमध्ये महिलांचा वाटा 3 टक्के होता. हे प्रमाण आता 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. येत्या दोन वर्षांत 12 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. येत्या काही वर्षांमध्ये 50 टक्के महिलांना नोकरी देण्याचा कंपनीचा मानस आहे.

टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects Freshers Hiring) बहुतेक विद्यार्थ्यांना एनआयटी (NIT) केंद्रांवरून वारंगल, कालिकत, सुरथकल, सिलचर आणि सुरतमधून कामावर घेतात. तर पदवीधरांना कंपनी मुंबई, मद्रास, कानपूर, खरगपूर, रुरकी आणि BHU मधून नोकरीची संधी देते. कंपनी नोकरीसाठी कॅम्पस भेटी देत ​​आहे. टाटा समूह तमिळनाडूतील होसूर प्लांटमध्ये अॅपल आयफोन उत्पादनासाठी 45,000 कामगारांची नियुक्ती करणार आहे. तर गेल्या सप्टेंबरमध्ये पाच हजार कामगारांना कामावर घेण्यात आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget