मुंबई : रामा स्टील ट्यूब्स या पेनी स्टॉकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. स्मॉल कॅप कंपनी असलेल्या रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअरमध्ये आज  10 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. आज या कंपनीचा शेअर 15.47 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मंगळवारी कंपनीचा शेअर 14.07 रुपयांवर बंद झाला आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यांमध्ये उच्चांकी पातळीवर 17.51 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर, निचांकी पातळीवर याची किंमत 9.91  रुपयांवर होता. कंपनीनं गेल्या काही दिवसांमध्ये दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. रामा स्टील ट्यूब्सनं 2016 नंतर आतापर्यंत तीनवेळा शेअरधारकांना बोनस शेअर दिलेले आहेत. 


15 दिवसांमध्ये शेअरमध्ये 53 टक्क्यांची वाढ


रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअरमध्ये 15 दिवसात 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचा शेअर 26 ऑगस्ट 2024 ला 10.10 रुपयांवर होता. 11 सप्टेंबरला कंपनीचा शेअर 15.47 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअरमध्ये 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कंपनीची मार्केट कॅप 2315 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 


रामा स्टील ट्यूब्स कंपनीनं 2016 पासून आतापर्यंत त्यांच्या शेअरधारकांना तीनवेळा अधिक शेअर दिलेले आहेत. 2016 ला त्यावेळी कंपनीनं का शेअरला चार शेअर दिले होते. तर, जानेवारी 2023 आणि मार्च 2024 मध्ये कंपनीनं बोनस शेअर दिले होते.    
  


रामा स्टील ट्यूब्स आता संरक्षण क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. कंपनीनं संरक्षण क्षेत्रामध्ये पूर्णपणे मालकीची असलेल्या रामा डिफेन्स प्रायवेट लिमिटेड कंपनीची निर्मिती केली आहे. या कंपनीला कॉरपोरेट मंत्रालयाकडून प्रमाणपत्र देखील मिळालं आहे. याशिवाय रामा स्टील ट्यूब्सनं ओनिक्स रिन्यूएबलसोबत करार देखील केला आहे.   


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


इतर बातम्या : 


RBI : मोठी बातमी! देशातील दोन बड्या बँकांना RBI चा दणका, कोट्यावधी रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?


Yojanadoot : योजनादूतसाठी अर्ज कुठे करायचा, किती तारखेपर्यंत मुदत, सरकार महिन्याला 10 हजार देणार, नेमकं काम काय करावं लागणार?