Yuzvendra Chahal Video : बीसीसीआयने भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीसाठी सर्व संघांची घोषणा केली आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला या दोन्ही संघात स्थान मिळाले नाही. त्यामध्ये तो इंग्लिश कौंटीकडे वळला. 


अनुभवी भारतीय लेग स्पिनरने इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन दोन सामन्यात डर्बीशायरविरुद्ध नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी 45 धावांत निम्मा संघाची शिकार केली.  


कौंटी क्रिकेटचा हा हंगामा युझवेंद्र चहलसाठी खुपत चांगला ठरला. या लेगस्पिनरने गेल्या महिन्यात वन डे चषकात केंटविरुद्ध 14 धावांत पाच बळी घेतले होते. चालू सामन्याच्या पहिल्या डावात 219 धावा केल्यानंतर नॉर्थम्प्टनशायरने चहल आणि रॉब केओघ (65 धावांत तीन विकेट) यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर डर्बीशायरला 61.3 षटकांत 165 धावांत गुंडाळले.


डर्बीशायरविरुद्ध नॉर्थहॅम्प्टनशायरकडून गोलंदाजी करताना चहलने वेन मॅडसेनला ज्या प्रकारे क्लीन बोल्ड केले ते आश्चर्यकारक होते. पडल्यानंतर चेंडू ज्या प्रकारे वळला त्यानंतर सगळेच हैराण झाले. या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






या काळात चहलने वेन मॅडसेन, एन्युरिन डोनाल्ड, जॅक चॅपेल, ॲलेक्स थॉमसन आणि जॅक मोर्ले यांच्या विकेट घेतल्या. चहलचा सहकारी पृथ्वी शॉ या काऊंटी हंगामात खराब कामगिरी करत आहे. त्याने सामन्याच्या दोन्ही डावात चार आणि दोन धावा केल्या. शॉ त्याच्या शेवटच्या तीन फर्स्ट क्लास इनिंगमध्ये 50 चा टप्पा ओलांडण्यातही अपयशी ठरला आहे.


हे ही वाचा -


Ind vs Ban : प्लेइंग-11मध्ये अडकला पेच! पहिल्या कसोटीसाठी संघात 4 स्पिनर, कर्णधार रोहित कोणावर खेळणार डाव?


AFG vs NZ : ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या खराब स्थितीबद्दल अफगाणिस्तान बोर्डाचे विधान, म्हणाले, BCCI ने आम्हाला....


AFG vs NZ : ग्रेटर नोएडा स्टेडियमवर टांगती तलवार; BCCI, अफगाणिस्तानमध्ये दोष कुणाचा? लागू शकते 1 वर्षाची बंदी