Yojanadoot : योजनादूतसाठी अर्ज कुठे करायचा, किती तारखेपर्यंत मुदत, सरकार महिन्याला 10 हजार देणार, नेमकं काम काय करावं लागणार?
महाराष्ट्र सरकारनं शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनादूत हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करावा लागेल. (प्रातिनिधिक फोटो)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र सरकार संपूर्ण राज्यात 50 हजार योजनादूत नेमणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात योजनादूत म्हणून काम करावं लागेल. यासाठी संबंधित उमेदवाराला दरमहा 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. योजनादूत म्हणून काम करण्याचा कालावधी साधारणपणे 6 महिने आहे. (प्रातिनिधिक फोटो)
या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा याशिवाय त्याला संगणकाचे ज्ञान असावं. त्याचं वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावं. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्यानं बँक खातं आधारशी संलग्न जोडलेलं असावं. (प्रातिनिधिक फोटो)
उमेदवाराला https://mahayojanadoot.org/ या वेबसाईटवर उमेदवार नोंदणी या पर्यायावर क्लिक करुन नोंदणी करता येईल. योजनादूतसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 सप्टेंबर आहे. (प्रातिनिधिक फोटो)
यासाठी संबंधित उमेदवाराकडे आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र, रविहासी दाखला, बँक खात्याचा तपशील नोंदवावा लागेल. मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचलनालय यांच्यावतीनं राबवण्यात येत आहे.(प्रातिनिधिक फोटो)