Property fraud News : आजकाल केवळ ऑनलाईन घोटाळेच होत नाहीत, तर नवरा-बायकोच्या नात्यातही लोक आर्थिक फसवणूक करत आहेत. एक अशीच घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. पत्नीने पतीच्या विश्वासाचा गैरवापर करुन 3.6 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा फ्लॅट (flat) विकून पैशांची उधळपट्टी केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील एका 74 वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे.
मुंबईतील एका 74 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 70 व्या वर्षी 56 वर्षीय महिलेशी लग्न केले होते. पतीने तिच्यावर खूप विश्वास व्यक्त केला होता. परंतु महिलेने स्वतःच पतीच्या पाठीमागे 3.6 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा फ्लॅट विकून पैसे उकळले आहेत. या 74 वर्षीय व्यक्तीचा पहिल्या पत्नीपासून फार पूर्वी घटस्फोट झाला होता. 2019 मध्ये त्याने दुसरे लग्न केले होते. त्याविरोधात त्याने आता पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तो स्वतः एक टेलिव्हिजन सीरियल निर्माता आहे आणि त्याने आपली ओळख गुप्त ठेवली आहे.
2019 मध्ये दोघांनी केले होते लग्न
2017 मध्ये त्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर हळूहळू त्याचा आणि फसवणूक केलेल्या महिलेचा संपर्क वाढू लागला. अशा प्रकारे 2019 मध्ये दोघेही पती-पत्नी बनले. त्यावेळी पतीचे वय 70 आणि रेणूचे वय 56 वर्षे होते. त्या माणसाला पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. दुसऱ्या पत्नीची फसवणूक त्यांच्या एका मुलाच्या सुनेसोबत मालमत्तेच्या वादानंतरच त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाने आणि त्यांच्या बायकोने म्हणजे सुनेने एका मालमत्तेबाबत मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांना न्यायालयाच्या फेऱ्या मारणे अवघड होते, त्यामुळं त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला मालमत्तेचे पॉवर ऑफ अॅटर्नी दिले होते. याचदरम्यान, त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांची फसवणूक केली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधीत महिलेने डिसेंबर 2020 मध्ये तिच्या पतीच्या पाठीमागे तिच्या नावावर असलेला फ्लॅट विकला. यानंतर तिने पतीच्या बँक खात्यातून 3.61 कोटी रुपये स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. आता या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणजे काय?
पॉवर ऑफ अॅटर्नी हे खरे तर कायदेशीर दस्तऐवज आहे. यामध्ये मालमत्तेचा मालक किंवा एखादी व्यक्ती आपले अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करते. जेणेकरून तो त्याच्या जागी आवश्यक निर्णय घेऊ शकेल. पॉवर ऑफ अॅटर्नी जारी करणार्या व्यक्तीला प्रिन्सिपल, ग्रांटर किंवा दाता म्हणतात. तर ज्या व्यक्तीच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी बनवली जाते त्याला वकील, एजंट किंवा डोनी म्हणतात. पॉवर ऑफ अॅटर्नी इतर कारणांसाठी देखील वापरली जाऊ शकते. जसे की टॅक्स रिटर्न भरणे, शेअर्सचे व्यवहार करणे, बँकेशी संबंधित कामे हाताळणे इ. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांसाठी हे एक अतिशय उपयुक्त कायदेशीर साधन आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Cyber Crime Indian Army : सायबर चोरांची फसवणुकीसाठी आयडिया; आता थेट भारतीय जवानांच्या नावाने फसवणूक