Property Demand in India: भारतात आलिशान घरांची (Luxury Housing) मागणी झपाट्याने वाढत आहे. कोरोनापासून लोकांना पुन्हा मोठ्या घरांची गरज भासू लागली आहे. यामुळेच 2023 मध्ये लक्झरी घरे आणि व्हिला विभागाची मागणी सर्वाधिक होती. आता 2024 मध्येही स्थिती राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकांचे वाढते उत्पन्न, अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती आणि बदलती जीवनशैली यामुळं आलिशान घरांची मागणी गेल्या वर्षी 112 टक्क्यांनी वाढली आहे.
प्रॉपर्टी फर्म NoBroker च्या अहवालानुसार, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये भारतात लक्झरी घरांची मागणी 112 टक्क्यांनी वाढली आहे. वाढत्या उत्पन्नामुळं आणि बदलत्या जीवनशैलीमुळं हे घडत आहे. नो ब्रोकरच्या मते, 2023 मध्ये देशात लक्झरी घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2022 च्या तुलनेत लक्झरी रियल्टी मालमत्तेची विक्री दुपटीने वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. मिळालेल्या अहवालानुसार, मेट्रो शहरांमध्ये व्हिला घेण्याची मागणी वाढत आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर), हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये या आलिशान घरांना सर्वाधिक मागणी निर्माण झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मेट्रो शहरांमधील लोकांचे वाढते उत्पन्न हे आहे.
लोकांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत
नोब्रोकरचे संस्थापक सौरभ गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियल इस्टेट मार्केटमध्ये लक्झरी हाऊसिंग क्षेत्र सर्वात वेगाने वाढत आहे. मोठ्या आणि चांगल्या समाजात राहण्याची लोकांमध्ये मोठी इच्छा आहे. लोकांचे प्राधान्यक्रम बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदीदारांचे बजेटही वाढले आहे. हाय नेट वर्थ (HNI) आणि अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्ती (UHNI) ची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ राहण्यासाठीच नाही तर गुंतवणुकीसाठीही हे लोक प्रॉपर्टीला चांगला पर्याय मानत आहेत. वाढती महागाई देखील त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहे.
मेट्रो शहरांमध्ये मागणी झपाट्याने वाढली
मिळालेल्या आकडेवारीनुसार, बंगळुरुमधील सर्जापूर आणि देवनहल्ली, ग्रेटर नोएडा, दिल्ली-एनसीआरमधील नोएडा आणि गुरुग्राम, एमएमआर, कोल्लूर, मुंबईतील तेल्लापूर आणि हैदराबादमधील मोकिला हे गेल्या वर्षभरात मोठ्या संख्येने व्हिला लॉन्च करुन हॉटबेड म्हणून उदयास आले आहेत. कोविडपूर्व वर्षांच्या तुलनेत बंगळुरुमध्ये व्हिलाच्या मागणीत 32 टक्क्यांनी जास्त होती. यानंतर दिल्ली एनसीआरमध्ये 25 टक्के, मुंबईत 30 टक्के आणि हैदराबादमध्ये 27 टक्के वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: