एक्स्प्लोर

दिलासादायक! मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, इथेनॉल निर्मितीसाठी मकेची होणार खरेदी; पण दर किती?

इथेनॉल निर्मितीच्या (Ethanol Production) संदर्भात केंद्र सरकारनं (Central Government) मोठा निर्णय घेतलाय. इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आता ऊसाऐवजी (Sugarcane) मकेचा (Maize) जास्त वापर केला जाणार आहे.

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीच्या (Ethanol Production) संदर्भात केंद्र सरकारनं (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आता ऊसाऐवजी (Sugarcane) मकेचा (Maize) जास्त वापर केला जाणार आहे. साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं आता ऊसाऐवजी मका अधिक वापरण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती ही मकेपासून केली जाणार आहे. 

सहकारी संस्थांकडून ठराविक दराने मक्याचा पुरवठा केला जाणार

मक्यापासून इथेनॉल बनवण्याबाबत सरकारने मोठा बदल केला आहे. आता इथेनॉल निर्मात्यांना सहकारी संस्थांकडून ठराविक दराने मक्याचा पुरवठा केला जाणार आहे. एकीकडे, या बदलामुळं इथेनॉलचे अखंड उत्पादन सुनिश्चित होईल, तर दुसरीकडे बाजारात साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत होईल. साखरेचं उत्पादन कमी होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कारण यावर्षी साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळं साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. या कारणामुळं मकेपासून इथेनॉल निर्मितीला सरकार चालना देत आहे. 

2291 रुपये प्रति क्विंटल दराने मकेचा पुरवठा होणार

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारनं सहकारी संस्था नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांना इथेनॉल तयार करण्यासाठी यावर्षी 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने मका पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही सहकारी संस्था 2023-24 या पीक वर्षात 2,090 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किंमतीवर मका खरेदी करतील आणि इथेनॉल निर्मात्यांना 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने पुरवठा करतील.

सध्या ऊसापासून सर्वाधिक इथेनॉल निर्मिती

सध्या देशात प्रामुख्यानं ऊसाचा वापर इथेनॉल बनवण्यासाठी केला जात आहे. ऊसापासून साखरही बनवली जाते. नुकतीच साखरेच्या दरात वाढ झाली आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत साखरेचा कमी पुरवठा हे त्याचे प्रमुख कारण होते. त्यानंतर सरकारनं साखर कारखान्यांना इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाचा वापर करू नये, त्याऐवजी मकेचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, विपणन वर्ष 2023-24 (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) दरम्यान देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकार खबरदारीच्या उपाययोजना करत आहे. साखर उत्पादनासाठी ऊसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, सरकार पर्याय म्हणून मक्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळेच सरकारने अलीकडे मक्याच्या पुरवठ्यात बदल केले आहेत.

देशात 22.48 दशलक्ष टन मकेचं उत्पादन अपेक्षीत 

जुलै 2023 ते जून 2024 दरम्यान म्हणजेच 2023-24 पीक वर्षात देशातील मका उत्पादन 22.48 दशलक्ष टन अपेक्षित आहे. ही आकडेवारी कृषी मंत्रालयाने आपल्या पहिल्या प्रगत अंदाजात दिली आहे. त्याचवेळी, तेल कंपन्यांनी कॉर्नपासून बनवलेले इथेनॉल खरेदीचे दर 5.79 रुपये प्रति लिटर केले आहेत.

तो निर्णय सरकारनं घेतला मागे

देशात साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध झाला होता. यानंतर सरकारनं ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा दिली होती. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! केंद्र सरकारनं निर्णय बदलला, इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; ऊस उत्पादकांसह कारखानदारांना मोठा दिलासा 

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Embed widget