Nandurbar: नंदुरबार शहरात अफवांमुळे तणाव निर्माण झाला असून, बिस्मिल्ला चौक आणि परिसरात  दगडफेक रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडफेक झाली . यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या 15 नळकांड्या फोडल्या. शहरात अफवांचे पेव फुटल्याने दगडफेकीपर्यंत प्रकार गेल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या शहरातील या संवेदनशील भागात या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Stonepelting)


नक्की घडले काय?


सकाळी त्रिकोणी बिल्डिंग परिसरात एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट एकत्र जमले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गुन्हे दाखल करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. रात्री आठ वाजेनंतर शहरातील विविध भागांमध्ये अफवांचे पेव फुटल्याने संवेदनशील भागात दगडफेक सुरू झाली.दगडफेकीमुळे बिस्मिल्ला चौक आणि त्यासमोरील परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांकडून 15 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यानंतर जमाव पांगला असून, संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


पोलिस अधीक्षक श्रावण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जमावाला पांगवून आता पोलिसांकडून संशयितांना शोधण्यासाठी धरपकड सुरू आहे.शहरात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र, तणाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.सध्या नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा संवेदनशील भागात तैनात आहे. अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची दक्षता वाढवण्यात आली आहे. 


हेही वाचा:


Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण