एक्स्प्लोर

9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना

 जर तुम्हाला तुमचे पैसे कोणत्याही जोखमीशिवाय वाढवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची एक योजना भन्नाट आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Post Office Scheme :  जर तुम्हाला तुमचे पैसे कोणत्याही जोखमीशिवाय वाढवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही एक सरकारी हमी योजना आहे. जी 5 वर्षांत परिपक्व होते. जर तुमच्याकडे निवृत्तीचे पैसे, जमीन विकून मिळालेले पैसे किंवा कोणतेही मोठे एकरकमी पैसे असतील, तर तुम्ही NSC मध्ये गुंतवणूक करुन चांगले व्याज मिळवू शकता. यामध्ये मिळणारा परतावा निश्चित आहे. तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन KYC आणि आवश्यक कागदपत्रे सादर करुन खाते उघडू शकता.

कोण गुंतवणूक करु शकते?

या योजनेत कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तुम्ही एकटे खाते उघडू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. ज्यामध्ये जास्तीत जास्त 3 प्रौढ सामील होऊ शकतात. 10 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची मुले देखील स्वतःचे खाते उघडू शकतात. जर मूल लहान असेल किंवा एखादी व्यक्ती मानसिक आजारी असेल, तर त्याचे पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनी बनवू शकता. तुम्ही या योजनेत तुम्हाला हवे तितके खाते उघडू शकता.

एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त गुंतवणूक करु शकता

किमान गुंतवणूक फक्त 1000 रुपये आहे आणि कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला हवी तितकी गुंतवणूक करा. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीच्या कक्षेत येते. तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त गुंतवणूक करु शकता.

तुम्हाला किती परतावा मिळेल?

सध्या, ही योजना दरवर्षी 7.7 टक्के व्याज देते, जी चक्रवाढीसह जोडले जाते.  व्याजाची रक्कम 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळते. पहिल्या 4 वर्षांचे व्याज पुन्हा गुंतवले जाते, ज्यावर कर सूट मिळते, परंतु 5 व्या वर्षाचे व्याज करपात्र आहे.

गरज पडल्यास, तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता

तुम्हाला कधी पैशांची गरज भासल्यास, तुम्ही बँक किंवा एनबीएफसीमध्ये तुमचे एनएससी गहाण ठेवून कर्ज देखील घेऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमची बचत मोडावी लागणार नाही आणि पैशांची व्यवस्था देखील केली जाईल. गुंतवणूकदाराच्या मृत्यूसारख्या काही विशिष्ट परिस्थितींमध्ये किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय, खाते 5 वर्षांपूर्वी बंद करता येत नाही.

पती-पत्नी दोघांसाठीही फायदेशीर

जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील, तर त्यांना संयुक्त खाते उघडून अधिक फायदे मिळू शकतात. समजा तुम्ही दोघांनी मिळून 9 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांनंतर तुम्हाला सुमारे 13 लाख 4 हजार 130 रुपये मिळतील. यापैकी 4 लाख 4 हजार 130 रुपये व्याजाच्या स्वरुपात असतील. एकंदरीत, ही योजना कमी जोखमीवर सरकारी हमीसह सुरक्षित परतावा हवा असलेल्यांसाठी योग्य आहे. पोस्ट ऑफिस एनएससी केवळ पैसे वाढवत नाही तर कर वाचविण्यास देखील मदत करते.

महत्वाच्या बातम्या:

छोटी बचत मोठा फायदा! 333 रुपयांची बचत करा, 17 लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना

महत्त्वाच्या बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget