Success Story: फणींद्र सामा (Phanindra Sama) हे स्टार्टअप्सच्या जगातातील एक प्रसिद्ध नाव आहे. फणींद्र सामा हे रेडबसचे (redBus) संस्थापक आहेत. ही आज भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन बस तिकीट कंपनी आहे. मात्र, 2013 मध्ये ही कंपनी इबिबो ग्रुपने विकत घेतली. त्यानी 5 लाख रुपयांची गुंतवणूक करुन ही कंपनी स्थापन केली होती. सध्या ही कंपनी 7000 कोटींची झाली आहे. 


redBus ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन बस तिकीट कंपनी आहे. आपल्या दोन मित्रांसह फणींद्र सामा यांनी या कंपनीचा पाया घातला. तिघांनी मिळून त्यात केवळ 5 लाख रुपये गुंतवले होते. नंतर तिचे रुपांतर 7,000 कोटी रुपयांच्या कंपनीत झाले. सणासुदीच्या काळात घरी जाण्यासाठी बसचे तिकीट काढता न आल्यानं कंपनी सुरु करण्याची कल्पना फणींद्र यांनाही आली. त्यानंतर ही कंपनी इबिबो ग्रुपने विकत घेतली. 


सामा यांना विविध संस्थांमध्ये कामाचा अनुभव 


फणींद्र हे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी तेलंगणाचे मुख्य नवोपक्रम अधिकारी म्हणूनही काम केले आहे, हे अनेकांना माहीत नाही. ते बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) चे माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयीन काळात त्यांची भेट सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांच्याशी झाली. त्यानंतर तिघेही घट्ट मित्र बनले. विविध संस्थांमध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर, तीन मित्रांनी केवळ 5 लाख रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह रेडबस सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे एक बस तिकीट प्लॅटफॉर्म आहे. त्याची सध्याची किंमत सुमारे 7,000 कोटी रुपये आहे.


2013 मध्ये, RedBus ची 828  कोटी रुपयांमध्ये विक्री 


2013 मध्ये, RedBus 828 कोटी रुपयांच्या सौद्यात दक्षिण आफ्रिकेच्या Naspers आणि चीनच्या Tencent यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या Ibibo ग्रुपने विकत घेतली. फणींद्र यांच्या नेतृत्वाखाली रेडबसने भारतातील बस तिकीट प्रणालीत क्रांती घडवून आणली. यामुळे ते अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक झाले. रेडबस सुरू करण्यापूर्वी फणींद्र टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये इंटिग्रेटेड सर्किट्सचे डिझायनर म्हणून काम करत होते. मोठ्या गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे, रेडबस उद्योगात त्वरीत बाजारपेठेचा नेता बनला. 2013 मध्ये रेडबसची विक्री करण्यात आली. परंतू, विक्री केल्यानंतरही ते बराच काळ रेडबसशी संबंधित राहिले. फणींद्र एक यशस्वी उद्योजक असण्यासोबतच सामाजिक उपक्रम आणि लोकोपयोगी उपक्रमांमध्येही सक्रिय आहेत. तेलंगणाचे मुख्य नवोन्मेष अधिकारी या नात्याने, त्यांच्या निपुणतेने शासनामध्ये नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी वाढविण्यात योगदान दिले आहे.


महत्वाच्या बातम्या:


IIT उत्तीर्ण तरुणाने सरकारी नोकरीऐवजी केली शेतीची निवड , आज वर्षाला कमवतोय 10 लाख रुपये