Petrol-Diesel Price Today 7th February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज सोमवार म्हणजेच, 7 फेब्रुवारी, 2022 रोजी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार आहेत. अशातच देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती अद्यापही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहेत.
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 93 डॉलरच्या घरात गेले आहेत. इंधन कंपन्यांना तेल खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. इंधन कंपन्यांकडून आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ टळली असल्याचे म्हटले जात आहे. मागील 94 दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत.
2014 नंतरचा कच्च्या तेलाच्या दराचा उच्चांक
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्चा तेलाच्या दराने उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूडच्या दरात 2.4 टक्क्यांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर 2014 नंतर एवढी उच्चांकी दरवाढ झाली आहे. सलग सात आठवडे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे.
देशातील महत्त्वाच्या शहरांतील किमती काय?