Petrol Diesel Price: इंधन दरवाढीने सामान्य नागरिक बेजार असताना महागाईचे चटके आणखी तीव्र झाले आहेत. आजपासून मुंबई आणि परिसरात सीएनजी, पीएनजी गॅसच्या (CNG PNG Gas Price Hike) दरात वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना आणखी अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले (Petrol Diesel Price Hike) आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून त्यात कोणताही बदल झाला नाही.
कच्च्या तेलाच्या दरात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर वधारले असून 98.57 डॉलर प्रति बॅरल इतका त्याचा दर झाला आहे. WTI क्रूड ऑईलचा दर 92.61 डॉलर प्रति बॅरल इतका दर झाला आहे. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत.
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
मागील पाच महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोलकात्यात 106.03 रुपये प्रति लिटर, मुंबईत 106.31 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर इतका आहे. डिझेलच्या दरातही कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे दिल्लीत 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत 97.28 रुपये प्रति लिटर, चेन्नईत 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये 92.76 रुपये प्रति लिटर इतका दर आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
सीएनजी-पीएनजी गॅस दरात वाढ
मुंबई आणि जवळपासच्या जिल्ह्यात महानगर गॅस लिमिटेडकडून (MGL) गॅस पुरवठा केला जातो. महानगर गॅसकडून सीएनजी दरात प्रति किलो साडे तीन रुपये आणि घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरात दीड रुपये प्रति एससीएम (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) दर वाढ करण्यात आली आहे.