Mumbai CNG PNG Price Hike : महागाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईकरांना बसणार आहे. याचं कारण म्हणजे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, महानगर गॅसकडून साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या (CNG) दरात वाढ केली आहे. तर, पीएनजीच्या दरात दीड रूपयांची वाढ झाली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार 5 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हे दर लागू होणार आहेत.

  


मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ 


देशभरासह राज्यात दिवसेंदिवस महागाईचं प्रमाण वाढलं आहे. तुमच्या घरातील गॅस सिलेंडरपासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत (Petrol-Diesel Price) प्रत्येक बाबतीत दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, महानगर गॅसकडून साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या (CNG) दरात वाढ झाली आहे. तर, घरगुती पीएनजीच्या (PNG) दरात दीड रूपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) वाढ झाली आहे. गेल्या महिन्यांत एमजीएलने सीएनजी आणि पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महागाईची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना सोसावी लागणार आहे.


सर्वसामान्यांना महागाईचा फटका 


मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर 89.50 प्रति किलो तर घरगुती पीएनजी दर 54 रुपये प्रति एससीएम असे जाहीर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत महागाईच्या झळा उसळल्या असून आता पुन्हा एकदा पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता रोज वापर असणाऱ्या सीएनजीच्या दरात साडे तीन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा सीएनजी गॅस दरात मोठी वाढ करण्यात असून सीएनजी वाहन धारकांचे धाबे दणाणले आहेत. 


पेट्रोल-डिझेलचे दर 


दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Archean Chemical कंपनीचा 1 हजार 400 कोटींसाठी आयपीओ 9 नोव्हेंबरला उघडणार, प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या