Petrol Diesel Price Today 31st December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) चढ-उतार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी घसरण सुरू असलेल्या कच्च्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेलच्या दरावर झाला नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर ( Today's Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात 2.45 डॉलरची वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 85.91 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, WTI क्रूड ऑइलच्या दरात 1.86 डॉलरने वाढ झाली आहे. WTI क्रूड ऑइलचा दर 80.26 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे.  काही दिवसांपूर्वी ब्रेंट क्रूड ऑइलचा दर हा 75 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर होता. 


राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर


> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
> परभणी: 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर


 देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर


> दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या 


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.


इतर महत्त्वाच्या बातम्या: