Small Saving Schemes Interest Rate Hike: केंद्र सरकारनं देशभरातील नागरिकांना नव्या वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. एनएससी, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. एक जानेवारी 2023 पासून नवीन व्याजदर लागू होतील. आज अर्थमंत्रालयाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  

छोट्या बचत योजनाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. किसान विकास  पत्र (KIsan Vikas Patra), पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना ( Post Office Deposit Schemes) एनएससी ( NSC) आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बचत योजना ( Senior Citizen Saving Schemes) यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना खूशखबर मिळाली आहे.  अर्थ मंत्रालयाने ( Finance Ministry) 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्चपर्यंत वरील बचत योजनाच्या व्याजदरात वाढ केली आहे.  पीपीएफ ( PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनाच्या ( Sukanya Samridhi Yojana)   व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

बचत योजना तिसऱ्या तिमाहीमध्ये व्याज   चौथ्या तिमाहीमध्ये
सेव्हिंग डिपॉजिट 4.00% 4.00%
1 वर्षाचं डिपॉजिट 5.50% 6.60%
2 वर्षाचं डिपॉजिट 5.70% 6.80%
3 वर्षाचं डिपॉजिट 5.80% 6.90%
5 वर्षाचं डिपॉजिट 6.70% 7.00%
5 वर्षाचं रेकरिंग डिपॉजिट 5.80% 5.80%
ज्येष्ठ नागरिकाच्या बचत योजना 7.60% 8.00%
मासिक इनकम अकाउंट 6.70% 7.10%
NSC 6.80% 7.00%
पीपीएफ 7.10% 7.10%
किसान विकास पत्र 7.0% (123 महिने) 7.2% (120 महिने)
सुकन्या समृद्धी योजना 7.60% 7.60%

PPF, सुकन्या योजनाच्या व्याजदारात बदल नाही
अर्थ मंत्रालयाने जानेवारी ते एप्रिल या तिमाहीसाठी व्याजदराची घोषणा केली आहे. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनाच्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही.  पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF) वर 7.1 टक्के, सुकन्या समृद्ध योजना (Sukanya Samridhi Yojna) वर 7.6 टक्के व्याज मिळतेय.  

आणखी वाचा:
Rajaram Sakhar Karkhana : आम्हाला मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याची निवडणूक घ्यावी; सभासदांची प्रादेशिक सहसंचालकांकडे मागणी