Petrol Diesel Price Today 27th October 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण (Crude Oil Price) सुरू होती. या घसरणीला ब्रेक लागला असून कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. तर, दुसरीकडे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर (Petrol Diesel Price Today) केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. देशात मागील पाच महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. 


कच्च्या तेलाच्या दरात तेजी


काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरल इतका झाला होता. कच्च्या तेलाच्या दरात होणारी घसरण थांबण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नोव्हेंबर महिन्यापासून अंमलात येणार आहे. गुरुवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑईलचा दर  95.91 डॉलर प्रति बॅरल इतका झाला. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 88.06 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे.   


देशात इंधन दर स्थिर 


वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवर वाढवण्यात आलेले कर कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मे महिन्यात केंद्र सरकारने उत्पाद शुल्कात कपात केल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले होते. त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे पाच रुपये आणि तीन रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतरही पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतरही दर कपात झाली नाही. रुपयाची घसरण होत असल्याने आयात महाग होणार आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार आहे. 


देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?


> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


राज्यातील प्रमुख शहरात दर काय?


> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर