Petrol Diesel Price in 15 December 2022: भारतात दररोज देशातील सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या (Crude Oil price) आधारावर पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) ठरवतात. ही किंमत राज्यानुसार बदलते कारण पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्यानुसार बदलतात. 


सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार सुरू आहेत. WTI कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल (WTI Crude Oil Price) बोलायचं झालं तर, ते त्याच्या जुन्या दरांवर स्थिर आहे आणि सध्या ते प्रति बॅरल 77.28 डॉलरवर आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ (Brent Crude Oil Price) झाल्यानंतर ते प्रति बॅरल 82.70 डॉलरवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे का? जाणून घेऊयात... 


देशाती पेट्रोल-डिझेलचे दर  


भारतातील सरकारी तेल कंपन्या भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum), इंडियन ऑइल (Indian Oil) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आज चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेल जुन्या दराने विकले जात आहे. जाणून घेऊया नवीन दरांबद्दल... 


Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


 इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.




 



इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).