IND vs BAN : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यंदा कमाल फॉर्मात दिसत आहे. तो सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळेच अय्यर 2022 मध्ये भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत टी-20 इंटरनॅशनलचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) मागे टाकलं आहे. सूर्याने या वर्षात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एकूण 1424 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1164 धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 260 धावा केल्या आहेत. 


पण श्रेयस अय्यर या वर्षी भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अय्यरने पहिल्या दिवसअखेर नाबाद 82 धावा केल्या आहेत. या डावात अय्यरने या वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा आकडा गाठला. या खेळीपर्यंत त्याने 2022 मध्ये सर्वाधिक 1571 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या धावांमध्ये अय्यरने कसोटीत 384* धावा, एकदिवसीय सामन्यात 724 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 463 धावा केल्या आहेत. तो अजूनही क्रिजवर असून भारत दौऱ्यात आणखी एक कसोटीही खेळणार असल्यानं श्रेयसची धावसंख्या नक्कीच आणखी वाढू शकते.


वन-डे मध्ये अय्यरची खास कामगिरी


अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1500 धावांचा आकडाही यंदा गाठला आहे. अय्यर वनडेमध्ये सर्वात जलद 1500 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 35 डावात हा आकडा पार केला आहे. त्याचवेळी केएल राहुलने एकदिवसीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या होत्या. अय्यरने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 48.30 च्या सरासरीने एकूण 1537 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 52.20 च्या सरासरीने 261 धावा केल्या आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय T20 मध्येही त्याने 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने आतापर्यंत 49 सामन्यांत 30.67 च्या सरासरीने 1043 धावा केल्या आहेत. या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 35.61 च्या सरासरीने आणि 141.15 च्या स्ट्राइक रेटने 463 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-