Petrol Diesel Price 29 May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दरचे जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी इंधनाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या आठवड्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 112 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. यानंतर तेल कंपन्यांनी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली होती. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असं तेल विक्रेत्यांनी सांगितलं.

प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या
आज मुंबई , दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत.

शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
मुंबई 111.35 97.28
दिल्ली 96.72 89.62
कोलकाता 106.03 92.76 
चेन्नई 102.63 94.24

 

महत्त्वाच्या इतर बातम्या