Petrol and Diesel Price Today : भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. दररोज सकाळी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतींच्या आधारे ठरवल्या जातात. असं असलं तरी गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण आज (4 मार्च) देशात काही राज्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल झाले आहेत.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ किंवा घट होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कालच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलचे दर काही ठिकाणी कमी झाले आहेत, तर काही ठिकाणी वाढले आहेत. देशातील महानगरांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- राजस्थानमध्ये 4 मार्च रोजी पेट्रोलचा दर 108.44 रुपये प्रति लिटर आहे. 3 मार्चच्या तुलनेत 0.59 पैशांची घट झाली आहे. तसेच, डिझेलची किंमत 0.53 प्रति लिटरने घटून 93.69 रुपये झाली आहे.
- मध्य प्रदेशात पेट्रोलचे दर 0.18 पैशांनी वाढून 109.61 रुपये झाला आहे. डिझेलचा दर 0.16 पैशांनी वाढून 94.81 रुपये प्रति लिटर झाला आहे.
- छत्तीसगडबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोलच्या दरांत 0.34 पैशांनी घट झाली असून, त्यानंतर पेट्रोलची किंमत 103.08 रुपये झाली आहे. तसेच, डिझेलची किंमत 0.33 ने कमी होऊन 96.06 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.
21 मेपासून महानगरांतील दर स्थिरच
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच दिवसांपासून स्थिर आहेत. यापूर्वी 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत मोठा बदल झाला होता. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ आणि सहा रुपयांनी मोठी कपात केली होती. तेव्हापासून या किमती जवळपास स्थिर आहेत. दरम्यान, भारतातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे ते सहसा किमतींमध्ये चढ-उतार होत राहतात. भारतात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर होतात.
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).